
Ratnagiri News : विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकद वाढवण्याचा प्रयत्नात आहे. याच प्रयत्नात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधील एक मोठा नेता फोडला आहे. कोकणातील कुणबी ओबीसी समाजाचे बडे नेता म्हणून ओळख असणाऱ्या सहदेव बेटकर यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या उपस्थित 'मातोश्री'वर हाती शिवबंधन बांधले.
गेल्या अनेक दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला ऑपरेशन टायगर आणि भाजपच्या सत्तेतील वाढत्या प्रभावामुळे खिंडार पडत होतं. शिंदे यांच्या बंडामुळे येथे माजी आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली होती. तर पक्ष फुटीचे लोन हे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून थेट ग्रामपंचायतपर्यंत पोहचले होते.
सहदेव बेटकर यांनी शिंदे गटातून विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी थेट गुहागर विधानसभा निवडणुकीत लढत दिली होती. यामुळे बेटकर यांच्या रूपाने तगडा चेहरा ठाकरे यांच्या गटाला मिळाला आहे.
दरम्यान विधानसभेवेळी ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांना शह देण्यासाठी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. पण त्यांना तेथे राजकीय भवितव्य न दिसल्याने काँग्रेसची वाट धरली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावले होते. गुहागर विधानसभा मतदारसंघात बेटकरांचा गावांशी, वाड्यांशी, कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क असल्याने त्यांना 52 हजार मतांपर्यंत मजल मारता आली होती.
जिल्हा परिषद सदस्य, सभापती म्हणून सक्रीय असणाऱ्या बेटकरांचा मात्र विधानसभेवेळी पराभव झाल्याने ते नाराज होते. तर सक्रीय राजकारणातून बाहेर होते. पण आता पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करत घरवापसी केली आहे. त्यांच्या या घरवापसीमुळे ठाकरे गटाला नवा बुस्टर मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.