Shahapur Election Result : अजितदादांच्या शिलेदाराने शहापूरचा गड राखला; शरद पवारांच्या उमेदवाराचा निसटता पराभव

Daulat Daroda Pandurang Barora NCP Mahayuti : शहापूर मतदारसंघात मागील निवडणुकीत दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोरा यांच्यातच चुरशीची लढत झाली होती.
Shahapur Daulat Daroda
Shahapur Daulat DarodaSarkarnama
Published on
Updated on

Shahapur Result : शहापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार दौलत दरोडा यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढली आणि जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पांडूरंग बरोरा यांना यावेळी निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला.

दौलत दरोडा यांना 73 हजार 81 मते मिळाली असून बरोरा यांना 71 हजार 409 मते मिळाली आहेत. भाजपच्या बंडखोर उमेदवार रंजना उघडा यांनीही चांगली मते मिळाली. त्यांनी 42 हजारांहून अधिक मते मिळवत चुरस निर्माण केली. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीचे उमेदवार दरोडा यांचे मताधिक्य घटल्याचे दिसून येते.     

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

Shahapur Daulat Daroda
Sanjay Kute Won : जळगाव जामोद मतदारसंघ भाजपचाच..., काँग्रेसचा सुपडासाफ

शहापूर मतदारसंघात मागील निवडणुकीत दौलत दरोडा आणि पांडुरंग बरोरा यांच्यातच चुरशीची लढत झाली होती. यामध्ये दरोडा यांनी जवळपास 16 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, यावेळची राजकीय समीकरणे वेगळी होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले आहेत. त्यामुळे दरोडा यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले होते. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

शिवसेनेचे उमेदवारी नाकारल्याने दरोडा यांनी पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी प्रवेश करत या मतदारसंघातून विजय मिळवला होता. पक्षफुटीनंतर ते अजित पवारांसोबतच राहिले. तर मागीलवेळी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढलेले बरोरा यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात होते. दोन्ही पक्ष फुटल्याने दरोडा यांनाच फटका बसण्याची शक्यता होती.

Shahapur Daulat Daroda
Sangram Thopate Defeat : अजितदादांनी अखेरच्या क्षणी टाकलेला डाव थोपटेंना पडला भारी; 45 वर्षांची सत्ता संपुष्टात

दरोडा यांच्याविरोधात दोन्ही शिवसेना गटातील कार्यकर्ते सक्रीय असल्याची चर्चा सुरूवातीपासून होती. तर बरोरा यांच्यामागे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद उभी होती. ठाकरेंच्या एका नेत्याने सुरूवातीला बंडखोरी केली होती. मात्र नंतर त्यांनी बरोरा यांना पाठिंबा दिला होता. तर भाजपच्या पदाधिकारी रंजना उघडा यांनी निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास पार्टीत प्रवेश करत उमेदवारी मिळवल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची बनली होती. त्यामुळे दरोडा पुन्हा बाजी मारणार का, याबाबत उत्सुकता वाढली होती. 

मागील निवडणुकीतील स्थिती –

दौलत दरोडा (राष्ट्रवादी) – 76,053

पांडुरंग बरोरा (शिवसेना) – 60,949

कृष्णा भवर (सीपीआयएम) – 10, 361

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com