Jalgaon Jamod Assembly Election 2024 final result live : विधानसभा निवडणुकीत भाजपने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील आपली पकड कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. कारण या मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.
राज्यभरातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून आता अनेक ठिकाणचे चित्र देखील स्पष्ट झालं आहे. अशातच बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. संजय कुटे (Sanjay Kute) यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर, भाजपचे डॉ. संजय कुटे वंचितचे डॉ. प्रवीण पाटील यांच्या प्रमुख लढत झाली.
मात्र, इथे पुन्हा एकदा भाजपने (BJP) विजय प्राप्त करत काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचा पराभव केला आहे. मतमोजणीत संजय श्रीराम कुटे 1,06,285 तर स्वाती संदीप वाकेकर 87,471 इतकी मते मिळाली. त्यामुळे कुटे हे 18,814 मतांनी विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात महायुती (Mahayuti) आणि महाआघाडी एकमेकांविरोधात लढत होती.
भाजपचे उमेदवार या ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मदतीने निवडणूक लढवली तर काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेना (Shivsena) (उद्धव ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने रसद पुरवली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली आहे.
जळगाव जामोद गेल्या विधानसभा निवडणुकीतही संजय कुटे यांनी काँग्रेसच्या डॉ. स्वाती वाकेकर यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीचे संगीतराव भोंगळ या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिले होते. या निवडणुकीत संजय कुटे 1,02, 735 मते मिळवून विजयी झाले होते.
तर काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांना 67,504 मते मिळाली होती. तर तिसऱ्या स्थानावरील संगीतराव भोंगळ यांना 29 हजार 985 मते मिळाली होती. 2009 पासून या मतदारसंघावर भाजपची एकहाती सत्ता आहे. इथले विद्यमान आमदार संजय कुटे असून ते भाजपकडून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर यंदा ते चौथ्यांदा आमदार म्हणून विजयी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.