Bhaskar Jadhav On Sanjay Raut: 'आमचेही लोक तोंड खुपसतात...'; भास्करावांनी चक्क संजय राऊतांनाच सुनावलं

Thackeray Group: "मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून बोलताना, आमचेही लोक तोंड खुपसतात..."
Bhaskar Jadhav, Sanjay Raut
Bhaskar Jadhav, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur News : आगामी निवडणुका पाहता राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे, पण यातच आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटासह खासदार संजय राऊत यांना नाव न घेता सुनावलं आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

"मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून बोलताना आमचेही लोक तोंड खुपसतात. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला काय आणि कुणाला पालकमंत्रिपद मिळाले काय ? कोण मेलं काय आणि कोण गेलं काय ? आपल्याला फरक पडला नाही पाहिजे, अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी राऊतांना सुनावलं. त्यामुळे आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Bhaskar Jadhav, Sanjay Raut
Devendra Fadnavis On Ajit Pawar : "...तर अजितदादांना 5 वर्षांसाठीच मुख्यमंत्री बनवू!" ; फडणवीसांचं मोठं वक्तव्य

या वेळी भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भाष्य केलं. "अजितदादांबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला स्टे करण्याचे धाडस त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री करत नव्हते.

आज दादांच्या निर्णयाला मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री स्टे देतात. दादांना खायचे दात वेगळे दिसले होते, आता दाखवायचे दात वेगळे दिसले असतील. एकनाथ शिंदे कोण ? अजितदादा काय ? याचे मूल्यमापन भाजपने केले आहे",असा टोलाही जाधव यांनी लगावला.

तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना जाधव यांनी भाजपला टोला लगावला. "आरक्षणाचा उद्रेक व्हायला भाजप आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. मराठा समाजाला आघाडीच्या काळात 2014 ला 16 आरक्षण मिळाले होते. त्याचा लाभही मिळाला होता.

पण देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आलं आणि हे आरक्षण गेलं. आता सरकार बदलून दीड वर्ष झालं तरी उद्धव ठाकरे यांना दोष देतात. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक समाजाला शब्द द्यायचा, त्यांना फसवण्याचा उद्योग भाजपने सुरू केला आहे", असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

Bhaskar Jadhav, Sanjay Raut
Ajit Pawar News : अखेर अजितदादांच्या मनासारखे झाले; भुजबळ वगळता त्यांच्या मंत्र्यांना इच्छित पालकमंत्रिपद मिळाले

"प्रत्येक समाजाला नाराज करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केले. भाजपचे फक्त एकच लक्ष आहे. दुसऱ्याचे पक्ष फोडणे आणि आपले सरकार टिकवणे. जनतेकडे यांचे लक्ष नाही. कुठलंही संकट नसताना महाराष्ट्रामध्ये लोकं किड्या-मुंग्यासारखे मरत आहेत. यांना सत्तेचं पडलं आहे", असा घणाघात भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर केला.

Edited by Ganesh Thombare

Bhaskar Jadhav, Sanjay Raut
ED Action On Sanjay Singh : मोठी बातमी ! दिल्लीतील मद्य घोटाळ्यात खासदार संजय सिंहांना ईडीकडून अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com