Konkan Politics : कोकणातील शिंदे सेनेच्या नाराज नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Sahdev Betkar joins Congress : मूळचे शिवसैनिक असलेले सहदेव बेटकर यांनी मुंबईतून समाजिक आणि राजकीय कार्यक्रमाला सुरुवात केली होती. बेटकर यांनी संगमेश्वर-धामापूर जिल्हा परिषद गटातून रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती.
Sahdev Betkar joins Congress
Sahdev Betkar joins CongressSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 08 September : मूळचे कट्टर शिवसैनिक, मात्र मागील विधानसभेची निवडणूक भास्कर जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून लढवलेले आणि गेली दोन वर्षांपासून शिंदे सेनेत नाराज असलेले रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सहदेव बेटकर यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याची ग्वाही बेटकर यांनी काँग्रेस प्रवेशानंतर दिली आहे.

मूळचे शिवसैनिक असलेले सहदेव बेटकर (Sahdev Betkar ) यांनी मुंबईतून समाजिक आणि राजकीय कार्यक्रमाला सुरुवात केली होती. बेटकर यांनी संगमेश्वर-धामापूर जिल्हा परिषद गटातून रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. बेटकर यांचे काम पाहून शिवसेनेने त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती केले होते.

गुहागर मतदारसंघातून मागील निवडणुकीत शिवसेनेने भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना तिकिट दिले हेाते. त्या वेळी सहदेव बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून गुहागर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांचा त्या निवडणुकीत अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव झाला होता.

Sahdev Betkar joins Congress
Anil Sawant : सावंतांच्या पुतण्याला का हवीय राष्ट्रवादीची उमेदवारी? अनिल सावंतांनी दिले 'हे' उत्तर...

सहदेव बेटकर यांनी दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या एका मेळाव्यात बोलताना रामदास कदम यांनी सहदेव बेटकर यांना भास्कर जाधव यांच्या विरोधात उभे करून निवडून आणणार, अशी घोषणा केली होती. मात्र, मध्यंतरी बेटकर यांचे नाव विधानसभा उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडले, त्यामुळे शिवसेना शिंदे गटात ते नाराज होते.

मध्यंतरीच्या काळात सहदेव बेटकर हे शिंदे सेनेतून बाहेर पडतील, अशी चर्चा रंगली होती. ती अखेर खरी ठरली आहे. सहदेव बेटकर यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईत टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बेटकर यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Sahdev Betkar joins Congress
Bhaskar Jadhav : माझ्या वाट्याला अनेक अडचणी...सध्या भीतीही वाटू लागलीय : भास्कर जाधव असं का म्हणाले?

मुंबई टिळक भवन येथे झालेला काँग्रेस पक्षातील प्रवेश हा प्राथमिक स्वरूपाचा आहे. लवकरच रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसचा मोठा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, असेही सहदेव बेटकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com