

३ फेब्रुवारी रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाचा महापौर विराजमान होणार आहे.
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे सत्तास्थापना शक्य झाल्याचा दावा समर्थकांकडून केला जात आहे.
श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ लागलेल्या बॅनरमुळे भाजप आणि शिंदे गटातील राजकीय तणाव चर्चेत आला आहे.
KDMC News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेचे नाट्य रंगात आले असतानाच शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला डिवचले आहे. येथे भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात महापौरपद आणि सत्तावाटपावर चर्चा सुरू असतानाच शिंदेंचा महापौरपद होणार हे जवळजवळ फिक्स झाले आहे. यावरून आता राजकारणातील बाजीगर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे अशा आशयाचे शहरात भव्य बॅनर झळकले आहेत. यावरून आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना हा मोठा पक्ष ठरला असून शिवसेनेचे 53 तर भाजपचे 50 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप येथे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यातच मनसेनं देखील शिवसेनेला पाठिंबा दिल्याने त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता महापालिकेत शिंदे गटाचा महापौर होणार हे निश्चित मानले जात आहे.
दरम्यान येथे निकालानंतर भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेत मोठ्या घडामोडी घडल्या असून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र रस्सीखेच पाहायला मिळाली होती. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे.
अशातच आता कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर बसण्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला डिवचले आहे. ३ फेब्रुवारी रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर बसणार असून शिवसेनेचा महापौर होणार आहे. तर या यशामागे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे असल्याचे बोलले जात आहे. त्यांनीच राजकीय समीकरणे जुळवून आणत महापौरपद शिवसेनेकडे खेचून आणल्याची चर्चा आहे. तर ४ फेब्रुवारी रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस असल्याने शहरभर बॅनर झळकत आहेत.
अशाच एका या बॅनरवर राजकारणातील बाजीगर असा उल्लेख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा केल्याने त्याची चर्चा होताना दिसत आहे. याच बॅनरमुळे भाजपला शिवसेनेनं डिवचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान महापालिका निवडणुकात महायुती म्हणून लढणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. कल्याणमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच चकमक दिसून आली होती. आता निवडणूकीचा निकाल लागला असून महापौर पदावरून वाद सुरू झाला होता. तोही थांबल्याचे बोलले जात असतानाच पुन्हा एकदा बॅनर वॉर पाहायला मिळत आहे.
1. कल्याण डोंबिवली महापौर कधी शपथ घेणार आहेत?
३ फेब्रुवारी रोजी शिंदे गटाचा महापौर शपथ घेणार आहे.
2. शिंदे गटाच्या यशामागे कोणाची भूमिका महत्त्वाची मानली जाते?
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
3. शहरात बॅनर का चर्चेत आले आहेत?
राजकारणातील बाजीगर श्रीकांत शिंदे या आशयामुळे बॅनर राजकीय चर्चेचा विषय ठरले आहेत.
4. भाजप आणि शिंदे गटात काय तणाव आहे?
महापौरपदासाठी दोन्ही पक्षांमध्ये तीव्र रस्सीखेच पाहायला मिळाली होती.
5. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणाचे वातावरण कसे आहे?
महापालिकेच्या सत्तास्थापनेमुळे शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.