KDMC Mayor : पहिला महापौर करण्याची संधी मनसेने गमावली! 'ती' एक चूक महागात पडली!

Kalyan-Dombivli MNS BJP : कल्याण डोंबिवली महापालिका महापौर निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणाऱ्या मनसेने युती करण्याची घाई करून महापौर पदाची संधी गमावल्याची चर्चा आहे
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Kalyan-Dombivli News : महापौर आरक्षणाच्या सोडतीनंतर मनसेने महापौर बनवण्याची संधी सोडल्याची चर्चा आहे. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित झाले आहे. मात्र, आरक्षणापूर्वीच मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठींबा देऊन ही संधी गमावल्याची चर्चा आहे.

भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या रस्सीखेचमध्ये मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गट स्थापन करून शिंदेंना पाठींबा दिला. गट स्थापनापूर्वी मनसेने जर महापौर पदाचा शब्द घेतला असता तर त्यांचा आता महापौर होऊ शकला असता. कारण एसटीच्या केवळ तीन विजयी उमदेवार असून दोन शिंदेंच्या शिवसेनेत तर एक मनसेसोबत आहे. मनसेच्या शीतल मंढारी या एसटी आरक्षित जागेवरून विजयी झाल्या आहेत.

किरण भांगले हे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक असून ते प्रथमच निवडणुकीत उतरले होते.तर, हर्षाली थवील या अनुभवी नगरसेविका असून पालिकेच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. महिला महापौर म्हणून त्यांना संधी दिली जाणार का, याकडे लक्ष आहे.

Raj Thackeray
मोठी बातमी : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या वाढणार; निवडणूक संपताच भाजप टाकणार नवा डाव

इच्छुकांमध्ये नाराज...

पाच वर्षाच्या कालावधीनंतर पालिकेत निवडणुका होत असल्याने व सत्तेची गणिते पाहता अनेकांनी पक्षांतर करत आपले वजन वाढवले होते. तसेच महापौर पदाच्या अपेक्षा ही बाळगल्या होत्या. खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडेल अशी आशा असल्याने दोन्ही पक्षातील मातब्बरांनी आपली मोर्चेबांधणी वरिष्ठांकडे करुन ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये भाजपाचे दिपेश म्हात्रे, मंदार हळबे, राहूल दामले, मोरेश्वर भोईर शिंदे सेनेचे सचिन पोटे, रमेश जाधव, रमेश सुकऱ्या म्हात्रे, विकास म्हात्रे, महेश गायकवाड, निलेश शिंदे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत होती. मात्र एसटी आरक्षण पडल्याने या गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक नगरसेवकांचा भ्रम निरास झाला आहे.

कल्याणला महापौरची संधी...

केडीएमसीच्या महापौर पदाच्या शर्यतीत मागील वर्षी डोंबिवलीला संधी मिळाली होती. यंदा देखील ही संधी डोंबिवलीला मिळते की कल्याणला जाते याविषयी अनेक आराखडे बांधले जात होते. मात्र डोंबिवलीतून एकही उमेदवार एसटी प्रवर्गातील नसल्याने ही संधी कल्याणला मिळाली आहे. यातही महिलांची नगरसेवकांची संख्या दोन असून एक पुरुष नगरसेवक आहे. त्यामुळे नक्की कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.

Raj Thackeray
Chandrashekhar Bawankule : सत्तास्थापनेसाठी अचलपूरमध्ये 'अजब' समीकरण? भाजप-एमआयएम युतीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com