बहुमत मिळूनही नीलेश लंकेंनी आणले आणखी दोन नगरसेवक

आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी अपक्ष व पारनेर शहर विकास आघाडीतील नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP ) आणण्याचा सपाटा लावला आहे.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

पारनेर ( अहमदनगर ) - पारनेर नगर पंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र निवडणुकीनंतर आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी अपक्ष व पारनेर शहर विकास आघाडीतील नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP ) आणण्याचा सपाटा लावला आहे. Nilesh Lanke brought two more corporators

पारनेर नगरपंचायतीत बहुमतापासून दोन अंकाने मागे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निकालानंतर दोनच दिवसांत बहुमतच नव्हे तर त्याही पेक्षा अधिक नगरसेवकांची जुळवाजुळव केली आहे. पक्षाने थेट आपल्या नगरसेवकांचा 10 चा अकडा पार केला आहे. अपक्ष नगरसेवक योगेश मते यांनी पक्षात प्रवेश केल्याने ही संख्या पूर्ण झाली आहे. नगरपंचायतीच्या निकालानंतर आमदार नीलेश लंके यांनी दोनच दिवसांत तीन नगरसेवकांना आपल्या पक्षात घेऊन नगर पंचायतीत बहुमतच नव्हे तर थेट 10 नगरसेवक केले आहेत.

Nilesh Lanke
नीलेश लंके म्हणाले, ते विद्यार्थी कोरोनामुक्त होईपर्यंत मी त्यांचा पालक...

पारनेर नगरपंचायतीच्या निकालानंतर 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात, शिवसेनेचे सहा तर शहर विकास आघाडीला दोन भारतीय जनता पक्षाला एक व अपक्ष एक अशी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. त्रिशंकू स्थिती झाल्याने निकालानंतर लगेचच राजकीय घडामोडीना वेग आला होता. निकालानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच शहर विकास आघाडीतर्फे निवडून आलेल्या नगरसेविका सुरेखा भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार लंके यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्या नंतर लगेचच शहरविकास आघाडीचे दुसरे नगरसेवक भूषण शेलार यांनीही त्याच दिवशी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरपंचायतीत नऊ सदस्य झाले होते. त्यांचे बहुमत तयार झाले होते.

Nilesh Lanke
नीलेश लंके म्हणाले, मी पाकिस्तानातून आलोय का ?

आज (ता. 22 ) अपक्ष म्हणून निवडून आलेल्या योगेश मते यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अद्याप नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निघाले नाही. तोच राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगरपंचायतीत 10 नगरसेवक झाले आहेत.

शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या घटनेला 24 तास होत नाहीत तोच आता अपक्ष म्हणून निवडून आलेले प्रभाग तीनमधील सदस्य मते यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्वांना धक्का दिला आहे. मात्र त्यांनी प्रवेश करतानाच आपल्या प्रभागातील ठोंबरे वस्ती व महाजन मळ्यातील रस्त्यांसाठी आमदार लंके यांच्याकडून सुमारे 70 लाखाचा विकास निधी घेऊन त्या कामांचा प्रारंभ करतच पक्ष प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने या पूर्वीच बहुमत प्राप्त केले असून त्यांनी नऊ सदस्यांची गटनोंदणीही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com