Shiv Sena Vs Modi : कुठे गेला शिखर बँक अन् सिंचन घोटाळा? ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींना विचारणा...

Maharashtra Political News : "भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरच प्रकरण का क्लोज होतात?"
Maharashtra Political News : Shiv Sena Vs Narendra Modi | Ajit Pawar
Maharashtra Political News : Shiv Sena Vs Narendra Modi | Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : "भ्रष्टाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तावातावाने बोलत असतात. 'ना खाऊंगा, ना खाने दूँगा, अशी मोदींनी दिलेली घोषणा ही फार गाजली. भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना तुरुंगात टाकू अशी घोषणा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर बँक आणि सिंचन घोटाळा चव्हाट्यावर आणला. त्याचे आता काय झाले? यावर मोदी आणि भाजपने भाष्य करावे," अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) नेता संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केली. (Latest Marathi News)

Maharashtra Political News : Shiv Sena Vs Narendra Modi | Ajit Pawar
Ajit Pawar Group : सिंचन घोटाळ्याच्या पैशातून 15 कोटींची 80 वाहनं खरेदी केली?; अजित पवारांवर खळबळजनक आरोप

"नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या भाजप नेत्यांनी यावर भाष्य करावे. भाजपाशी निगडीत लोकांच्या प्रकरणांचा क्लोजर रिपोर्ट कसा येतो? खासकरून भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरच प्रकरण का क्लोज होतात? इतरांच्या नशिबी असे सुख का नाही, यावर मंथन करावे लागेल," अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थेट नाव न घेता केली. राऊत यांनी एकाच बाणात भाजपा आणि अजित पवार यांना लक्ष्य केले. (Latest Political News)

Maharashtra Political News : Shiv Sena Vs Narendra Modi | Ajit Pawar
Shikhar Bank Scam Update: अजित पवारांना शिखर बँक घोटाळाप्रकरणी मोठा दिलासा; दुसऱ्यांदा 'क्लोजर रिपोर्ट'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"अशा प्रकारचे क्लोजर रिपोर्ट हाच देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. भाजपाने अवलंबलेल्या या तंत्राची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भीती वाटत होती. त्याचमुळे त्यांनी भाजपसोबत संधान बांधले. आता त्यांना शांत झोप लागते. मात्र, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी असे संधान बांधण्यास नकार दिला. निडरपणे ते सामोरे जात आहेत. लोकनियुक्त मुख्यमंत्री असलेल्या सोरेन यांच्या विरोधात ईडीच्या आडून दडपशाहीची कारवाई करणे, कितपत योग्य असल्याचा प्रश्न उपस्थित करीत फक्त विरोधात आहे, म्हणून सुडाने कारवाई करणे ही लोकशाहीची दुर्दशा झाल्याचे स्पष्ट करीत असल्याचे," संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut News)

भाजपाच्या संदर्भात ज्यांची भूमिका वेगळी अशांना ईडीच्या नोटीसा येतात. त्यांना अटक होते वा केली जाईल. मात्र, भाजपात गेलेल्यांना रान मोकळे. त्यांना मोकळे सोडले जाते, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना राऊत यांनी स्पष्ट केले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com