
Kokan Politics : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून आपण दोन-अडीच हजार मतांनी पुढे होतो. पण यावेळी साडे सव्वीस मतांनी मागे पडलो. मात्र, विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून योगेश कदम 26 हजार मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीची मते महायुतीच्या उमेदवारासाठी उभी करण्यात आपल्याला यश आले. आता मी भाईंच्या पत्राची वाट बघतोय. ते पत्र आले की मी त्यांच्यासोबत बसेन, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपण अजूनही रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांविषयीच्या पत्राची वाट बघत आहोत, असे सांगितले. ते सावर्डे इथे पक्षाच्या बैठकीत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 90 टक्के कार्यकर्त्यांनी योगेश कदम (Yogesh Kadam) यांचे काम केले नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री रामदास कदम यांनी केला होता. इतकंच काय तर सुनील तटकरे यांचा उजवा हात असलेल्या गावांमध्येही योगेश कदम यांना मते मिळालेली नाहीत. याबाबत मी सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले होते.
पण त्याचवेळी आमचे कुठेही मतभेद नाहीत किंवा नाराजीही नाही. कारण तटकरेंच्या मनामध्ये असे कदापिही येणार नाही. याची मला कल्पना आहे. पण मंडणगड तालुका प्रमुख, दापोलीचा तालुका प्रमुख यांच्यासह जवळपास 90 टक्के लोकांनी योगेश कदम यांचे काम केले नाही, असाही आरोप कदम यांनी केला होता.
आता कदम यांच्या याच पत्राची वाट पाहत असल्याचे तटकरे (Sunil Tatkare) यांनी म्हंटले. निवडणुकीत यश मिळविल्यानंतर स्वच्छ भूमिका घेऊन काम करायचे असते. आपण आजपर्यंत माझे कुणी काम केले नाही असे म्हटले नाही. पण आज आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघातून आपण दोन-अडीच हजार मतांनी पुढे होतो. पण यावेळी साडे सव्वीस मतांनी मागे पडलो. गुहागरमध्येही पिछेहाट झाली.
मात्र, विजयानंतरही आपण कुणी माझे काम केले नाही असे म्हटले नाही. त्यामुळे आता भाईंच्या पत्राची वाट बघतोय. ते पत्र आले की मी त्यांच्यासोबत बसेन. शेवटी या सर्वाचा आढावा घेणे जरूरीचे असते, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. आता रामदास कदम तटकरे यांना पत्र लिहिणार का? की त्यांचे आरोप हवेतच विरणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.