Kokan Politics : गोगावलेंची कट्टर विरोधक अन् ठाकरेंची वाघीण भाजपच्या वाटेवर; एका दगडात दोन पक्षी मारणार...

Snehal Jagtap Shiv Sena UBT BJP Politics : स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून महाड विधानसभेची निवडणूक लढवली होती.
Uddhav Thackeray, Snehal jagtap, Bharat Gogawale
Uddhav Thackeray, Snehal jagtap, Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Kokan News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत करत आहेत. यावरून चर्चा झडत असतानाच भाजपही मागे नसल्याचे समोर आले आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या कट्टर विरोधक व ठाकरेंच्या वाघीण भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.

महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप ठाकरेंचे शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी महाड विधानसभा मतदारसंघातून मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या त्या कन्या आहेत. स्नेहल जगताप यांनी काँग्रेस सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

Uddhav Thackeray, Snehal jagtap, Bharat Gogawale
Santosh Deshmukh Murder Case : नवे सीसीटीव्ही फुटेज समोर; धनंजय देशमुख म्हणाले, मीही संशयाच्या भोवऱ्यात अडकलो!

महाडमध्ये स्नेहल जगताप यांचे राजकीय वजन आहे. पण आता त्या ठाकरेंना धक्का देणार असल्याची चर्चा आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार व मंत्री भरत गोगावले यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती. गोगावले यांच्या त्या कट्टर विरोधक मानल्या जातात. त्यामुळे ठाकरेंना सोडून त्या भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

स्नेहल जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास एकाचवेळी दोन्ही शिवसेनेला झटका बसणार आहे. महाडमध्ये गोगावलेंविरोधात भाजपला तगडा चेहरा मिळणार आहे. तर ठाकरेंच्या वर्चस्वही आपोआप कमी होईल. भाजपलाही महाडमध्ये आपली राजकीय ताकद वाढवता येईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray, Snehal jagtap, Bharat Gogawale
Uday Samant : दावोस दौरा सोडून सामंत मुंबईत; ठाकरेंना देणार सर्वात मोठा धक्का, आमदारांचा आकडा अन् ठिकाणही सांगितलं...

फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोस गेले आहेत. ते महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांच्याच उपस्थितीत स्नेहल जगताप यांचा भाजप प्रवेश होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळ जगताप यांचा पक्षप्रवेश किती महत्वाचा आहे, हे स्पष्ट होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com