Eknath Shinde : 'इज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची', उद्धव–राज ठाकरेंना कोपरखळी मारत शिंदेंची जहरी टीका

Eknath Shinde Attacks Uddhav–Raj Thackeray Unity : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमिवर शिवसैनिकांना कानमंत्र देत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : 'मी रडत बसणारा नाही तर लढणारा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. कोकणाने कायम शिवसेनेवर प्रेम केले आहे. ही जनता आणि कार्यकर्ता हेच आमचे ऐश्वर्य आहे. बाळासाहेबांचे विचार आमची संपत्ती आहे. विचारांची संपत्ती सोबत घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रत्नागिरीतच नव्हे, तर कोकणात भगवा फडकवा', असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. त्यांनी, विरोधक कमजोर आणि कपटी आहेत, हे लक्षात ठेवून शिवसैनिकांनी निवडणुकीच्या कामाला लागावे, अशाही सूचना केल्या आहेत. तर यावेळी उद्धव-राज ठाकरे पुन्हा एकत्र आल्यावरूनही त्यांनी तोफ डागली असून इज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची, अशी कोपरखळीदेखील मारत जोरदार टीका केली आहे.

ते वि. दा. सावरकर नाट्यगृहात (रत्नागिरी) शिवसेनेच्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार किरण सामंत, नीलेश राणे, रवींद्र फाटक, माजी आमदार सुभाष बने, राजन साळवी, संजय कदम, राजन तेली, राजेंद्र महाडीक, सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, पक्षाचा प्रमुख नव्हे तर तुमचा कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलोय. मी प्रमुख असलो तरी तुम्ही शिवसेनेची ताकद आहात. कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे. बाळासाहेबांचे विचार कोकणातील घराघरात पोहोचले आहेत. कोकणी जनतेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची संपत्ती खोलवर रूजली आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : 'स्थानिक'साठी एकनाथ शिंदेंचा वेगळाच प्लॅन, महायुती नव्हे स्वबळाचा नारा !

1997 पासून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. यापुढील 56 वर्षे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकत राहिला पाहिजे. शिवसेनेने कायम जनतेच्या दुःखात जाऊन त्यांना मदत करण्याचे काम केले. अतिवृष्टी, पूर, आतंकवादी हल्ले येथे सर्वप्रथम शिवसैनिकच पोहोचतो. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातही मदतीचा हात देणारी शिवसेनाचा होती. आम्ही केवळ दौरे करत नाही तर मदतही करतो.

‘शासन आपल्या दारी‌’ या कार्यक्रमातून आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या अभियानाचा राज्यातील 5 कोटी नागरिकांना फायदा झाला. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मदत करता आली. विरोधकांनी न्यायालयात जाऊन योजनेला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने फटकारल्यानंतर योजना सुरूच राहिली. यापुढेही योजना सुरू राहणार आहे. विरोधकांनी कितीही फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला तरी महिलाच त्याला निवडणुकीद्वारे उत्तर देतील.

रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चौफेर जोमाने मुसंडी घेत आहे, तरीही थांबू नका. वाडीतील प्रत्येक घराघरात पोहोचा. निवडणूक आली की, आमची आठवण होते, असे बूथप्रमुखाला वाटणार नाही. इतका मानसन्मान बूथप्रमुखाला पक्षामार्फत दिला गेला पाहिजे. निवडणुकीत सतर्क राहणे आवश्यक असते. महायुती म्हणून कोकणातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवण्याचा निर्धार करून कोकणचा कायापालट करूया, अशी गर्जना शिंदे यांनी केले.

पराभव झाला की आयोग, ईव्हीएमवर आरोप

मुख्यमंत्री असताना आपण थेट जनतेमध्ये जात होतो. काहींनी घरातून मुख्यमंत्रिपद सांभाळले. जनतेला थेट भेट घेणारा मुख्यमंत्री हवा होता. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत 60 आमदार निवडून दिले. आता विरोधकांच्या नाकातोंडात पाणी गेले आहे. पराभव झाला की, ते आयोगावर आरोप करतात. यश मिळाले की, ईव्हीएम मशिन चांगली असते, असेही शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Raj - Uddhav Thackeray एकत्र आले तर कॉंग्रेसची भूमिका काय? Nana Patole म्हणाले...

FAQs :

1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा का झाला?
शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून आगामी निवडणुकांसाठी तयारीचा आढावा घेतला.

2. शिंदेंनी कोणावर टीका केली?
शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यावरून टीका केली.

3. शिंदेंनी शिवसैनिकांना काय सांगितले?
शिंदेंनी “कामाला लागा, जनता आपल्यासोबत आहे” असे सांगत निवडणुकांपूर्वी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.

4. हा दौरा कोणत्या पार्श्वभूमीवर झाला?
हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झाला.

5. शिंदे यांच्या भाषणाचा मुख्य संदेश काय होता?
शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या राजकारणावर हल्लाबोल करत शिवसेना शिंदे गटच खरा बाळासाहेबांचा वारसदार असल्याचा दावा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com