
Ratnagiri News : कोकणात सध्या शिवसेना प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली जातेय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपकडून तसे प्रयत्न केले जातायेत. मात्र रत्नागिरीत ठाकरे गटाचे दोन शिलेदार या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे काम करत आहेत. दरम्यान भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात करताना जिव्हारी लागणारी टीका केली होती. त्याला माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर देताना सडकून टीकास्त्र डागलं आहे. Vaibhav Naik Hits Back at Narayan Rane Over Uddhav Thackeray Allegations
नारायण राणे यांनी शुक्रवारी (ता.11) ठाकरेंवर घणाघाती टीका करताना, मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणाला काय दिले?’, असा सवाल केला होता. ‘खालून वरपर्यंत काम करण्यासाठी ठाकरे कोकणात येणार आहे का? असा सवाल करताना, त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा, किती पैसे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्गाला दिले? हे समोर येईल. यामुळे ठाकरेंना कोकणावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही.
ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवू नका म्हणजे झालं. ते फक्त तेच करायला येतात बाकी काही करत नाही, असा जिव्हारी लागणारा टोला गलावला होता. आता याच टीकेला वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
वैभव नाईक यांनी, सगळेच लोक राणेंसारखे कृतज्ञ असू शकत नाहीत. कोकणला आणि राणेना बाळासाहेबांनी आणि शिवसेनेने भरभरून दिलं आहे. हे कदाचित ते विसरले असतील. असो पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोनाच्या काळात दोन्ही जिल्ह्याना शासकीय मेडिकल कॉलेज दिली आहेत.
तौक्ते वादळामुळे उद्धवस्त झालेल्या कोकणाला भरीव मदत देणारे उद्धव ठाकरेच होते. मात्र केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनी एक दमडी सुद्धा दिली नाही, असा दावा देखील वैभव नाईक यांनी राणेंचा आरोप खोडून करताना केला आहे. तसेच राणे कुटुंबाकडून चिपी विमानतळाबाबत सतत ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांवर देखील वैभव नाईक यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी, चिपी विमानतळाच काम अनेक वर्ष रखडलेल होतं. मात्र ते देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मार्गी लागलं.
मात्र राणेंसारखे कृतज्ञ लोकांना ते आठवणार नाही. पण उद्धव ठाकरे जेव्हा कोकणात येतील तेव्हा त्यांच भरभरून स्वागत जनता करेल. कोंबड्यावरून या राज्यात कोणता नेता परीचीत आहे हे सगळ्यांना माहीत आहे. तर उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिले? हे देखील माहीत असल्याचा टोला वैभव नाईक यांनी राणेंच्या आरोपावरून टोला लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.