

Raigad MLC Shivsena NCP Deal : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर डील झाल्याची चर्चा असून अनिकेत तटकरे यांच्या विधानपरिषद उमेदवारीचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. तर याबदल्यात शिवसेनेला रायगडचे पालकमंत्रिपद सोडले असून शिवसेनेनं अचूक टायमिंग साधत रायगडचे पालकमंत्रीपद पदरात पाडून घेतल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. अशातच शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी यासर्व शक्यता धुडकावून लावत आपल्याला याबाबत काही माहिती नसून अशा डील झाल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यभरात सध्या विधानपरिषद निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून कोकणात कमालीचे राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील मित्र पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून जोरदार फिल्डिंग लावली जात असून आता कार्यकर्तेही आक्रमक होताना दिसत आहेत. यामुळे रायगड विधानपरिषदेच्या जागेची जोरदार चर्चा सुरू आहे.
एकीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना ही जागा देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र अनिकेत तटकरे यांना विरोध करताना दिसत आहेत. शिवसेना कार्यकर्ते ही जागा विकास गोगावले यांच्यासाठी मागत असून ते आग्रही दिसत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री पदासह ही जागा देखील आमचीच असल्याची त्यांनी थेट म्हटले आहे. तर गरज पडल्यास येथे मैत्रिपूर्ण लढत होईल असेही संकेत देण्यात आले आहेत.
यावरूनच आता फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी, विधान परिषदेची निवडणुक जाहिर झाली असून महायुतीकडून विकास गोगावले यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना लोक प्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
या विषयी महाडमध्ये बैठक घेत विकास गोगावले यांना उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आली. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी अगर पक्ष वाढीसाठी हा निर्णय घेतला. पण उमेदवारी देणे हे नेत्यांच्या हातात आहे. शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला आणि पदाधिकाऱ्यांना मान्य करवा लागेल, असे गोगावले यांनी म्हटले आहे.
तसेच यावेळी गोगावले यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील डीलबाबत विचारणा केली असता त्यांनी, अशा डील झालेल्या नाहीत. हा चर्चेचा विषय होऊच शकत नाही आणि अशी ही चर्चा झालेली नाही. पण शिंदेसाहेब आणि वरीष्ठ पातळीवर काही चर्चा झाली असेल तर मला त्याबद्दल मला कोणतीच माहिती नाही. मात्र शिंदेसाहेबांनी मला पालकमंत्री पद मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेही ते म्हणाले.
दरम्यान आता शिवसेना नेत्यांसह कार्यकर्त्यांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेनंतर आता गोगावले यांनीच या डीलबाबत आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर ते देखील मुलासाठी आग्रही असल्याचीच जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. तर ही जागा कोणाला मिळणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.