Uday Samant : वाद शांत होत नाही तोच उदय सामंतांनी पुन्हा मित्र पक्षाला डिवचलं? स्वबळाचा नारा देणाऱ्या नितेश राणेंना गोंजारतच इशाराही दिला

Uday Samant - Nitesh Rane Politics : तळकोकणातील सिंधुदुर्गमधील महायुतीत दूही पडल्याचे दिसून येत आहे. येथे भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
Uday Samant - Nitesh Rane Politics
Uday Samant - Nitesh Rane Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मंत्री नितेश राणे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

  2. त्यांच्या या भूमिकेला मंत्री उदय सामंत यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाल्याचे संकेत आहेत.

  3. सामंत यांनी सिंधुदुर्गमध्ये राबवलेला युतीचा पॅटर्न रत्नागिरीतही लागू केला जाईल असे सांगत भाजपला इशारा दिला आहे.

Ratnagiri News : तळकोकणासह संपूर्ण कोकणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून महायुतीत वाद पाहायला मिळत आहे. रत्नागिरीत स्वबळाचा नारा दिल्यावरून मंत्री उदय सामंत यांनी आगपाखड केली होती. मात्र सिंधुदुर्गमध्ये आगामी स्थानिक निवडणुकांसाठी मंत्री नितेश राणे यांनी दिलेला ‘एकला चलो’चा नारा आणि स्वबळाची घोषणा त्यांना मान्य असल्याचे दिसत आहे. उदय सामंत आणि नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून महायुतीत वाद सुरू असतानाच सामंत यांनी पुन्हा एकदा भाजपला इशारा दिला आहे. यामुळे नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच मंत्री नितेश राणे यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा विचार असल्याचे सांगितले. त्यामुळे राणे यांनी एकनाथ शिंदेंना राजकीय धक्का देण्याचा प्लॅन तयार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. नितेश राणे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.

तसेच “सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही मैत्रीपूर्ण लढतीतून निवडणुका लढवू. प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे आणि तशी संधी मिळत असेल तर तिचे स्वागत करायला हवे. जर आमची युती झाली तर उभाठा आणि महाविकास आघाडीला तयार उमेदवार सहज मिळतील,” अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Uday Samant - Nitesh Rane Politics
Uday Samant : भाजप, राष्ट्रवादीची 'खुमखुमी' काढणाऱ्या उदय सामंतांचा यू-टर्न! म्हणाले, 'शिंदे साहेबांना...'

त्यावरून आता कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे रत्नागिरीत स्वबळाच्या नाऱ्यावरून उदय सामंत यांनी मित्र पक्षांची कानउघडणी करत ‘खुमखुमी’ हा शब्दप्रयोग केला. त्यामुळे महायुतीत राजकीय तापमान वाढले असून आता तो शब्द का वापरला, याचे कारण स्वतः सामंत यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, “कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढाव्यात, ही आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे.”

तसेच स्थानिक नेत्यांनी तोंडसुख घेणे आम्हाला अजिबात मान्य नसल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी युतीबाबत नितेश राणे यांनी दिलेले उत्तर योग्य असल्याचे म्हटले. पण भाजपला अप्रत्यक्ष इशाराही दिला. “रत्नागिरी आणि रायगडमध्ये युतीबाबत कोणता निर्णय होतो, याकडे आमचे लक्ष असेल. कारण सिंधुदुर्गमधील युतीवरच रत्नागिरीतील युती अवलंबून आहे.

“जर सिंधुदुर्गमधील युतीत आमच्या कार्यकर्त्यांना योग्य जागा आणि मान-सन्मान मिळाला, तर तोच पॅटर्न आम्ही रत्नागिरीत राबवू. आमचे यावर बारकाईने लक्ष आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी माझ्याकडून तसे वक्तव्य झाले. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पण तालुका आणि जिल्हा स्तरावर काही जण ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांची मनं दुखावली जात आहेत. याची दक्षता सगळ्यांनी घ्यायला हवी, असे त्यांनी सुचवले. “काही जणांचे राजकारणातील आयुष्य केवळ सहा ते सात वर्षांचे आहे. त्यांनी मला राजकारण शिकवू नये. मी रत्नागिरी जिल्हा कोळून प्यायलो आहे,” असा इशारा सामंत यांनी दिला.

Uday Samant - Nitesh Rane Politics
NCP Slam Uday Samant : सामंतांची भाजप-राष्ट्रवादीची खुमखुमी काढण्याची भाषा; दादांच्या शिलेदाराने दोनच शब्दात थंड केली

FAQs :

1. प्रश्न: नितेश राणे यांनी काय विधान केले आहे?
उत्तर: नितेश राणे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा विचार व्यक्त केला आहे.

2. प्रश्न: उदय सामंत यांनी या विधानावर काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: सामंत यांनी अप्रत्यक्षपणे राणेंच्या स्वबळाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

3. प्रश्न: सिंधुदुर्ग पॅटर्न म्हणजे काय?
उत्तर: सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे पण मैत्रीपूर्ण पद्धतीने निवडणुका लढवल्या होत्या.

4. प्रश्न: या घडामोडींचा महायुतीवर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: या भूमिकेमुळे महायुतीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

5. प्रश्न: रत्नागिरीत युती कायम राहील का?
उत्तर: सध्या अस्पष्ट स्थिती आहे; मात्र स्थानिक स्तरावर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com