

Ratnagiri News : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीत बंडाची ठिणगी पडली आहे. १७ जागांच्या निवडणूक होत असताना ८ ठिकाणी बंडाची ठिणगी पडली आहे. यावरून आता महायुतीतील पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ज्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले असून अब्दुल सत्तार यांनी भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत गंभीर आरोप केला आहे.
तसेच त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यायला हवं असेही प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी देखील आपल्यालाही वाटते की दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली असून यावर शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना (यूबीटी) नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर आरोप करत आपल्याला ही वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात. पण मला वाटून काय होणार आहे. हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांच्या हातात असल्याचे म्हटलं होतं. ज्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांच्याकडून भाजपवर गंभीर आरोप झाले होते. त्यांनी भाजपने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचे हातपाय तोडले. आता तर शिवसेनेचे शीरही कापतं असल्याचा आरोप केला होता. तसेच आता दोन्ही शिवसेना एकत्र असयाला हव्या होत्या अशी भावनाविवस प्रतिक्रिया दिली.
या दोन्ही नेत्यांच्या प्रतिक्रियांच्या नंतर राज्यात आता राजकारणातील नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी यावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, अंबादास दानवे नेमकं काय बोललं हे माहित नाही. पण जर तुम्ही (पत्रकार) म्हणता म्हणून जर ते असं बोलले असतील तर ती त्यांची व्यक्तिगत भावना असेल. ती भावना त्यांनी व्यक्त केली असेल. पण याबाबत पक्षीय धोरण ठरवण्याचा अधिकार हा सर्वस्वी पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
तसेच अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील भास्कर जाधव यांनी भाष्य केलं असून अब्दुल सत्तार कोणत्या अधिकारात हे वक्तव्य केलं, हे माहित नाही. दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या संदर्भात दोन्ही नेते निर्णय घेऊ शकतात. मात्र आता संपूर्ण राजकारणाचा विचका झाला आहे. राजकारणात काय घडेल, हे सांगता येत नाही, असे म्हणत भास्कर जाधव यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.