BJP controversy : जे कुठेच घडले नाही ते कोकणात घडलं, भाजपचा डाव फसला? नव्या आघाडीत शेकापसह दोन्ही शिवसेना एकत्र

Sudhagad Sanman Samiti Vs BJP : राज्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून महायुती आणि महाविकास आघाडी सह आता नव्या आघाड्यांनी राजकीय वातावरण तापवण्यास सुरूवात केली आहे.
Sudhagad Sanman Samiti Vs BJP
Sudhagad Sanman Samiti Vs BJPsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • भाजपने तालुक्याबाहेरील उमेदवार दिल्याने सुधागडमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

  • याच नाराजीमधून ‘सुधागड सन्मान समिती’ नावाची सर्वपक्षीय आघाडी उभी राहिली आहे.

  • जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी हा राजकीय धमाका भाजपसाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

Raigad Zilla Parishad elections News : अमित गवळे

राज्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात एक अभूतपूर्व राजकीय धमाका झाला आहे. भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद गटासाठी तालुक्याबाहेरील उमेदवार आयात केल्याने स्थानिक निष्ठावंतांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. यातूनच आता 'सुधागड सन्मान समिती' नावाच्या नव्या शक्तीचा उदय झाला असून, यात चक्क शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), शेकाप आणि भाजपचेच नाराज गट एकत्र आले आहेत.

सोमवारी (ता. 19) रात्री या सर्वपक्षीय नाराज पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सुधागडच्या स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे.

यामुळे "सुधागडचा स्वाभिमान धोक्यात आला आहे" अशी भावना स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झाली. देशात आणि राज्यात जिथे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांचे तोंड पाहत नाहीत, तिथे सुधागडमध्ये मात्र भाजप विरोधात भाजपसह सर्व पक्ष एका झेंड्याखाली आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Sudhagad Sanman Samiti Vs BJP
BJP Politics: भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेना धक्का; कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला!

असे असेल संभाव्य जागावाटप

या समितीने भाजपच्या विरोधात तगडी मोर्चेबांधणी केली असून जागांचे वाटपही जवळपास निश्चित केले आहे. त्यानुसार जांभुळपाडा जिल्हा परिषद गट - संभाव्य उमेदवार शिवसेना (शिंदे गट), जांभुळपाडा पंचायत समिती गण संभाव्य उमेदवार शिवसेना (शिंदे/ठाकरे गट), परळी पंचायत समिती गण संभाव्य उमेदवार शिवसेना (शिंदे/ठाकरे गट), राबगाव जिल्हा परिषद गट संभाव्य उमेदवार शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), राबगाव पंचायत समिती गण संभाव्य उमेदवार शिवसेना (शिंदे गट), अडुळसे पंचायत समिती गण संभाव्य उमेदवार राजेश मपारा (सुधागड सन्मान समिती)

बालेकिल्ल्यात मोठे आव्हान...

भाजपचे नेते राजेश मपारा आणि श्रीराम प्रतिष्ठान ग्रुपने या उठावात महत्त्वाची भूमिका घेतल्याचे समजते. भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पक्षाच्या निर्णयावर नाराज असल्याने त्यांनी 'सुधागड सन्मान समिती'ला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपसमोर आपल्याच बालेकिल्ल्यात मोठे आव्हान उभे राहिले आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष सुधागडकडे

देशातील सर्वात बलाढ्य पक्ष असलेल्या भाजपला रोखण्यासाठी सुधागडमध्ये झालेली ही "विचित्र पण ऐतिहासिक युती" यशस्वी होणार का? हा प्रश्न आता विचारला जात आहे. ही एकजूट केवळ निवडणुकीपुरती आहे की यामुळे तालुक्याची राजकीय समीकरणे कायमची बदलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. समितीची अधिकृत घोषणा आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच या अभूतपूर्व लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मात्र, या धमाक्याने विरोधकांच्या गोटात सध्या तरी सन्नाटा पसरला आहे.

Sudhagad Sanman Samiti Vs BJP
BJP’s Politics : महापालिकेनंतर ZP तही भाजप शिवसेना-राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत, महायुतीच्या सूचना हवेत...

FAQs :

1) सुधागड तालुक्यात नेमका वाद कशामुळे निर्माण झाला?
भाजपने जिल्हा परिषद गटासाठी तालुक्याबाहेरील उमेदवार दिल्याने स्थानिक निष्ठावंत नाराज झाले.

2) ‘सुधागड सन्मान समिती’ म्हणजे काय?
भाजपच्या निर्णयाविरोधात उभी राहिलेली सर्वपक्षीय संघटना म्हणजे ‘सुधागड सन्मान समिती’.

3) या समितीत कोणते पक्ष सहभागी आहेत?
शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), शेकाप आणि भाजपचे नाराज नेते या समितीत आहेत.

4) या घडामोडींचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
भाजपच्या मतांवर फटका बसून निवडणुकीत मोठा उलटफेर होऊ शकतो.

5) हा प्रकार राज्यात वेगळा मानला जातो का?
होय, विविध पक्षांचे नेते एका मुद्द्यावर एकत्र येणे ही अभूतपूर्व घटना मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com