Shivsena UBT Politics : तळकोकणात शिवसेनेचा मास्टर मूव्ह, शिंदेंसह महायुतीची डोकेदुखी वाढणार? आगामी स्थानिकसाठी भास्कर जाधवांसह आता मुलगाही मैदानात

Son of MLA Bhaskar Jadhav Political News : तळकोकणातील शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी निवड करून शिवसेनेने मास्टर स्ट्रोक खेळला आहे.
Eknath Shinde MLA Bhaskar Jadhav And Vikrant Jadhav
Eknath Shinde MLA Bhaskar Jadhav And Vikrant Jadhavsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. तळकोकणातील एकमेव शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या सुपुत्र विक्रांत जाधव यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे.

  2. या निर्णयाला पक्षात मास्टर स्ट्रोक मानलं जात असून, कोकणातील संघटना अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

  3. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला तळकोकणात नवा जोश आणि नेतृत्व लाभणार आहे.

Ratnagiri News : तळकोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आगामी स्थानिकच्या आधी मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. तळकोकणातील शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांच्या दुसऱ्या पुढीच्या खांद्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी दिली आहे. उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय समिकरणे बदण्यास मदत होणार आहे.

तळकोकणात सध्याच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे. येथे ठाकरे यांच्या शिवसेनेतून पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपमध्ये जाताना दिसत आहेत. तर ही गळती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवादाच्या अभावामुळे तर नेत्यांनी पक्ष संघटनेच्या बांधणीकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच होत असल्याचा सध्या आरोप होताना दिसत आहे. यामुळे जो पक्षाशी जोडला गेलेला कार्यकर्ता आहे तो कोणाच्या भरोष्यावर थांबायचे असा सवाल करत आहेत.

अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी विक्रांत जाधव यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या निवडीनंतर विक्रांत जाधव त्यावेळी त्यांचे वडील भास्कर जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी चिपळूण, गुहागर तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले. तसेच पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

Eknath Shinde MLA Bhaskar Jadhav And Vikrant Jadhav
Bhaskar Jadhav : 'रामदास कदमांची आता उलटी गिनती सुरू', शस्त्र परवाना प्रकरणावरून उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने डागली तोफ

कोण आहेत विक्रांत जाधव?

विक्रांत जाधव हे गुहागरचे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांचे चिरंजीव आहेत. ते रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत ग्रामीण भागातील रस्ते बांधणी, पाणीपुरवठा योजना आणि शैक्षणिक सुविधा सुधारण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं.

संघटनेला नव्याने बळकटी

जिल्ह्यात शिवसेनेला लागलेली गळतीसह शिवसेनेतील संघटनेला नव्याने बळकटी देण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने विक्रांत जाधव त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. यावेळी वरिष्ठ नेतृत्वाने विक्रांत जाधव यांच्या कार्यशैली, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क क्षमतेचा विचार केला आहे.

राजकीय समिकरणं बदणार?

एकीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांच्या मतदारसंघासह जिल्ह्यातील मात्तबर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत. शिवसेनेला सध्या चेहरे नसल्याची टीका होत आहे. अशावेळी विक्रांत जाधव यांची नियुक्ती राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नव्या नेतृत्वामुळे शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाकडून व्यक्त केला जात आहे. विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वामुळे युवा पिढीला प्रेरणा मिळेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळेल, असाही दावा पक्षाकडून केला जात आहे.

Eknath Shinde MLA Bhaskar Jadhav And Vikrant Jadhav
Bhaskar Jadhav : ‘छमछमदास, बामदास, भडवेगिरी करणारा, श्वान....’ भास्कर जाधवांकडून रामदास कदमांवर हल्लाबोल

FAQs :

प्र.1: विक्रांत जाधव कोण आहेत?
👉 ते शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र आहेत.

प्र.2: त्यांची कोणत्या पदावर नियुक्ती झाली आहे?
👉 त्यांची उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी निवड झाली आहे.

प्र.3: हा निर्णय का महत्वाचा मानला जातो?
👉 कारण यामुळे शिवसेनेने कोकणातील संघटनात्मक बळकटीवर भर दिला आहे.

प्र.4: या निर्णयावर पक्षात कशी प्रतिक्रिया आहे?
👉 पक्षात आनंदाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी याचे स्वागत केले आहे.

प्र.5: या नियुक्तीमुळे कोणता राजकीय बदल अपेक्षित आहे?
👉 तळकोकणातील शिवसेना पुन्हा संघटित होऊन आपली ताकद दाखवेल, अशी अपेक्षा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com