तळ कोकणात भाजपच्या गळाला उद्धव ठाकरेंचा नेता? गोवा-मुंबई महामार्गावरून रान उठवल्यानंतर घेतली थेट बावनकुळेंची भेट

Vaibhav Naik Meets Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांचे विश्वासू माजी आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही भेट रस्त्याच्या मुद्द्यावरून आंदोलन झाल्यानंतर घेतली आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मुंबई-गोवा महामार्गाच्या 11 वर्षांच्या विलंबावरून उद्धव सेना गटाचे वैभव नाईक यांनी कुडाळ येथे आंदोलन केले.

  2. आंदोलनादरम्यान भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांनी भेट घेतली.

  3. या भेटीला एकनाथ शिंदे गटाचे दीपक केसरकर उपस्थित असल्याने राजकारणात खळबळ उडाली.

Sindhudurg News : गेली अकरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यावरून संतप्त झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे आंदोलन केले. मात्र त्यांनी यावेळी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे यांची धडधड वाढल्याची बोलले जात आहे. या भेटीवेळी एकनाथ शिंदे यांचे विश्वासू दीपक केसरकर देखील उपस्थित होते. (Vaibhav Naik leads protest over Mumbai-Goa highway delay and meets BJP minister Chandrashekhar Bawankule with Deepak Kesarkar present)

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू माजी आमदार वैभव नाईक यांच्या बाबत सतत भाजप प्रवेशाच्या चर्चा होताना दिसत आहेत. गेल्यावर्षी देखील त्यांच्या प्रवेशाच्या अशाच चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी ऐन भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी विद्यमान भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा तत्कालिन मंत्री रवींद्र चव्हाण यांची गुप्त भेट घेतली होती. त्यावेळी देखील अशीच मोठी खळबळ उडाली होती. तर त्या भेटीनंतर वैभव नाईक भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. नारायण राणे आणि वैभव नाईक यांच्यामध्ये असणारे राजकीय वैर पाहता ते भाजपमध्ये जाणार नाहीत असेच बोलले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा ते भाजप मंत्र्यांच्या संपर्कात गेले असून भाजप प्रवेशाच्या चर्चांनवना उत आला आहे.

Chandrashekhar Bawankule
Vaibhav Naik : विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणात गुन्हा दाखल होताच माजी नगराध्यक्षासह मुलगा फरार! वैभव नाईक आक्रमक

दरम्यान बावनकुळे यांच्या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्टीकरण आता वैभव नाईक यांनी दिले असून ही भेट फक्त मुंबई गोवा महामार्गाच्या कामासह इतर महत्वाच्या प्रश्नांबद्दल झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, गेली अकरा वर्षे या महामार्गाचे काम रखडले असून हा रस्ता खड्डेमय झाला आहे. अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. पण यांच्यावर कारवाई न करता त्यांना भाजप पक्षात घेत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

सद्यस्थितीत कामाची गती पाहता अजून दोन तीन वर्षे हा महामार्ग पूर्ण होऊ शकेल असे वाटत नाही. त्यामुळे पुढील वर्षभरता हा महामार्ग पूर्ण व्हावा या मागणीसाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन केले. सिंधुदुर्ग वगळता इंदापूरपासून लांजापर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील ठेकेदार तीन तीन वेळा बदलण्यात आले आहेत. 2014 मध्ये काम घेऊन 2016 पर्यंत ठेकेदाराने काम केले नाही. म्हणून त्याला नोटीस देऊन 2019 मध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात आला. त्यानेही हे काम पूर्ण केले नाही. त्यामुळेच 2022 मध्ये ठेकेदार बदण्यात आला. पण याच ठेकेदारने भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याच्यावर कारवाई केली जात नाही.

त्यामुळे आम्ही या महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्याकडे या महामार्गाबाबत मागणी केली आहे. त्यांनी ही याकडे लक्ष देऊ अशी ग्वाही दिली आहे. पण जोपर्यंत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही. तो पर्यंत आपण रस्त्यावर उतरत राहू असेही वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान वैभव नाईक यांनी महसूल मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांनी ही भेट राजकीय नव्हती. त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढू नयेत. आम्ही आंदोलन करत असताना बावनकुळे यांनी स्वत: आम्हाला चर्चेसाठी बोलावले, त्यांनी सौजन्य दाखवलं. त्यांनी याबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यातील विविध महसूल विषयांवर देखील चर्चा झाली. येथील पालकमंत्र्यांना फक्त आरोप-प्रत्यारोपात रस असून तसे बावनकुळे यांनी केले नाही. उलट आम्हाला बोलवून त्यांनी चर्चा केली. आमचे प्रश्न जाणून घेतल्याचेही वैभव नाईक यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Vaibhav Naik : गोगावले बोलले अन् वैभव नाईकही आता भिडले, शिवसेनेला दिला इशारा; म्हणाले, 'तर...'

FAQs :

प्र.१: आंदोलन कोणत्या विषयावर झाले?
उ: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण 11 वर्षांपासून प्रलंबित असल्याने आंदोलन झाले.

प्र.२: वैभव नाईकांनी कोणाला भेट घेतली?
उ: भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली.

प्र.३: दीपक केसरकर का चर्चेत आले?
उ: ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असून या भेटीत उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com