Bhaskar Jadhav : विधानसभेत 'हायव्होल्टेज' ड्रामा! भास्कर जाधवांना नडणाऱ्या भाजप महिला आमदाराचे कान नार्वेकर यांनी टोचले; 'पहिल्या रांगेत...'

Rahul Narvekar And Bhaskar Jadhav on Devayani Farande : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज 'जीरामजी'विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी अभियानावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
Bhaskar Jadhav And Rahul Narvekar
Bhaskar Jadhav And Rahul Narvekarsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महाराष्ट्र विधानसभेत मनरेगा मुद्द्यावर भास्कर जाधव आणि देवयानी फरांदे यांच्यात वाद झाला.

  2. फरांदे यांनी जाधव यांच्या भाषणात व्यत्यय आणल्याने सभागृहात तणाव निर्माण झाला.

  3. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फरांदे यांची कानउघडणी केली.

Mumbai News : 'जीरामजी'विकसित भारत-रोजगार व आजीविका हमी (मनरेगा) योजनेतील मजुरांच्या थकीत पगारावरून विधानसभेत 'हायव्होल्टेज' ड्रामा पाहायला मिळाला. या योजनेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव याच मुद्द्यावर आक्रमक झाले असतानाच त्यांनी 'जीरामजी' या शब्दाचा उल्लेख करत सत्तादाऱ्यांनी आता लोकांचेही जय श्रीराम करायचे ठरवले आहे का? असा सवाल केला.

यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी भास्कर जाधवांना रोखत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. तसेच भास्कर जाधवांना "जय श्रीराम बोला" असा आग्रह धरला. यावरून सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी थेट आपल्या पक्षाच्या देवयानी फरांदे यांना कडक शब्दात झापत चांगलीच कानउघडणी केली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत आज एकदा सत्ताधारी आणि विरोध यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. मनरेगाच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्तादाधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडे होते. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी देखील या प्रश्नावर सरकारला फटकारत जोरदार भाषण केले.

Bhaskar Jadhav And Rahul Narvekar
Bhaskar Jadhav: "...तर महाराष्ट्र पेटला असता", भास्कर जाधवांनी घेतली शरद पवारांची बाजू; अजित पवारांच्या निधनावर विधानसभेत शोक प्रस्ताव

जाधव यांनी मनरेगा योजनेतील मजुरांच्या थकीत पगारावरून सरकारला धारेवर धरत, मजुरांचे पैसे चार-चार वर्षे का रोखले जातात, असा सवाल उपस्थित केला. तसेच 'जीरामजी' या शब्दाचा उल्लेख करत "सत्ताधाऱ्यांनी आता लोकांचेही जय श्रीराम करायचे ठरवले आहे का?" अशी मिश्किल सवालही विचारला.

याच भाषणावरून आता विधानसभेत 'हायव्होल्टेज' ड्रामा झाला. सत्ताधारी बाकावरील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी पहिल्या बाकावर येऊन थेट भास्कर जाधवांच्या भाषणात वारंवार व्यत्यय आणला. तसेच त्यांच्या भाषणात हस्तक्षेप करत त्यांनी "जय श्रीराम बोलावं असा आग्रह धरला. ज्यानंतर भास्कर जाधवांनी दोन्ही हात जोडत आपल्याला तुमच्या शिक्षणाची गरज नसल्याचे म्हणत फटकारले.

यावेळी सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील या वादात थेट हस्तक्षेप करत भाजप आमदार फरांदे यांनाचे थेट झापले. त्यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. फरांदे पहिल्या रांगेत येऊन गोंधळ घालत असल्याने नार्वेकर यांनी त्यांना कडक शब्दात कान टोचले.

नार्वेकर म्हणाले, फरांदे ताई, जागेवर जाऊन बसा. तुम्ही पहिल्या रांगेत येऊन बसलात म्हणजे तुम्हाला पहिल्या रांगेचे अधिकार मिळालेले नाहीत. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा, अशा शब्दात अध्यक्षांनी फरांदे यांना त्यांना फटकारले. याचवेळी भास्कर जाधवांनीही फरांदे यांना टोला लगावला. ते म्हणाले, "मॅडम, तुमच्याकडून शिक्षण घेण्याची माझी प्रज्ञा नाही. तुमची विद्वत्ता एवढी मोठी आहे की ती मला ती परवडणारी नाही".

यानंतर प्रश्नावरून सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाही मजुरांच्या प्रश्नावर सरकार उत्तर देत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षाने सभागृहातून वॉकआउट केले. तर संबंधित मंत्र्यांनी, सरकार मजुरांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून विरोधक केवळ राजकारण करत आहेत. केंद्राकडून निधी प्राप्त झाला असून येत्या एका महिन्यात सर्व मजुरांची देणी पूर्ण केली जातील, असे उत्तर दिले.

Bhaskar Jadhav And Rahul Narvekar
Bhaskar Jadhav : नारायण राणेंना भोवळ! ठाकरेंचा आमदार भावूक, राजकीय मतभेद विसरून दिली भावनिक प्रतिक्रिया

FAQs :

1. विधानसभेत वाद का झाला?
मनरेगा मुद्द्यावर भास्कर जाधव भाषण करत असताना व्यत्यय आल्यामुळे वाद झाला.

2. कोणत्या आमदारांमध्ये वाद झाला?
भास्कर जाधव आणि देवयानी फरांदे यांच्यात वाद झाला.

3. अध्यक्षांनी काय कारवाई केली?
राहुल नार्वेकर यांनी देवयानी फरांदे यांची कानउघडणी केली.

4. ही घटना कुठे घडली?
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घटना घडली.

5. या वादाचा पुढील परिणाम काय होईल?
राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून पुढील अधिवेशनातही चर्चा होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com