Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांचा सरकारवर संताप; बैठकीचा मुद्दा सांगत चांगलेच भडकले

Bhaskar Jadhav Targets Mahayuti Government : कोकणातील रस्ते खराब, वाहतूक कोंडी आणि इतर कारणांनी गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या आणि आता परतीच्या प्रवासात असणाऱ्या कोकणवासीयांचे हाल होताना दिसत आहे.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Chiplun News : गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेले चाकरमानी आता मुंबईकडे परतू लागले आहेत. मात्र वाहतूक आणि प्रवाशांच्या नियोजनाबाबत सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे कोकणवासीयांचे हाल होताना दिसत आहे. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेले चाकरमानी आता आपल्या नोकरीच्या ठिकाणी परतू लागले आहेत. मात्र रेल्वे गाड्यांचे आणि एसटी बसचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. तर बाय रोड जाणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे गोवा-मुंबई महामार्गावर अनेक ठिकाणी खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. तर गॅससाठी देखील तारेवरची कसरत प्रवाशांना करावी लागत आहे.

याच पाश्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी, गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी सरकारकडून केवळ घोषणाबाजी केली जाते; प्रत्यक्ष उपाययोजना मात्र कागदावरच राहतात, असा आरोप केला आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : 'महाजन- गोगावलेंना पालकमंत्रीपद का दिलं? भास्कर जाधवांनी कारणचं सांगितलं

गणेशोत्सवापूर्वीच वाहतूक आणि प्रवाशांच्या नियोजनाबाबत बैठक घेण्याची सूचना आपण सरकारला केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आता परतीच्या प्रवासात गणेशभक्तांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, असे देखील जाधव यांनी सांगितले.

Bhaskar Jadhav
Uday Samant Bhaskar Jadhav Meeting : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेतच सामंत-जाधव भेट; कोकणात राजकीय तर्क-वितर्क

तर गणेशोत्सवासाठी प्रत्येकाला आपल्या गावी यावे लागते; मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी येणार हे माहीत असूनही त्यांच्या येण्या-जाण्याचे नियोजन केले जात नसल्याचा आरोप देखील जाधव यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com