Uddhav Thackeray Konkan Daura: उद्धव ठाकरेंचं मिशन कोकण; दोन दिवसांच्या दौऱ्यात होणार सहा सभा

Uddhav Thackeray Konkan Daura: रायगड जिल्ह्यातून दोन फेब्रुवारीपासून हा दौरा सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यातील दौऱ्यात उद्धव ठाकरे विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांना बळ देण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Raigad News: आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवरच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे कोकणात दौरे वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी कोकण दौरा करत आढावा घेतला होता. यानंतर आता ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या कोकण दौर्‍यावर येत आहेत. (Uddhav Thackeray Konkan Daura)

रायगड जिल्ह्यातून दोन फेब्रुवारीपासून हा दौरा सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यातील दौऱ्यात उद्धव ठाकरे विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांना बळ देण्याची शक्यता आहे. रायगडमधील तीनही आमदार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. तर दोन तारखेला पोलादपूर येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार ? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Suryakant Dalvi News : कोकणात उद्धव ठाकरे गटाला धक्का; माजी आमदाराचा मोठा निर्णय

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून रायगड लोकसभेसाठी अनंत गीते यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा या दौऱ्यात करण्याची शक्यता आहे. माजी खासदार अनंत गीते यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आपली रायगडची उमेदवारी जाहीर केल्याचे म्हटले आहे. आता या दौऱ्यात उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

शिंदे शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांच्याविरोधात महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांना ठाकरे गट बळ देण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे हे स्नेहल जगताप यांच्या उमेदवारीबाबत काही बोलतात का ? हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

अलिबाग विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी व कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. या दौऱ्यात लोकसभेसाठी सुनील तटकरे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखण्यात येणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीतीही या दौऱ्यात ठरण्याची शक्यता आहे.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर अलिबाग येथील ठाकरे गटाचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र म्हात्रे यांना उद्धव ठाकरे बळ देण्याची शक्यता असून ते संभाव्य विधानसभेचे उमेदवार मानले जातात. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर ठाकरे गटाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना ठाकरे गडाकडून बळ मिळण्याची शक्यता आहे. ते कर्जत विधानसभेचे संभाव्य उमेदवार मानले जातात. त्यामुळे रायगड जिल्ह्यातून सुरु होणाऱ्या दौऱ्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेमकं काय बोलणार ? कोणावर निशाणा साधणार ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Uddhav Thackeray
Bjp vs Shinde Group : नीतेश राणेंच्या वक्तव्याने शिंदेंचे मंत्री गोत्यात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com