अजितदादांच्या वेगळ्या भूमिकेनंतर आता ठाकरे बंधूंच्या मोर्चाबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय आला समोर; तटकरेंनी दिली माहिती

Sunil Tatkare On Thackeray brothers' march : राज्य सरकारने केलेल्या हिंदी सक्तीविरोधात राज्यात नाराजी उमटली आहे. या निर्णयाविरोधात आता ठाकरे बंधू मोर्चा काढणार असून याचा फटका महायुतीला फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जातेय.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raigad/Mumbai News : राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. तर मराठी भाषेच्या अस्मितेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे पहिल्यांच एकत्र येत आहेत. पाच जुलैला मुंबई भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या मोर्चाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आपला पाठिंबा दिला आहे. तसेच कम्युनिष्ट पक्ष देखील हिंदीच्या विरोधात असून मराठी कलाकार आणि साहित्यिक देखील या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी देखील वैयक्तिक आपल्याही या निर्णयाला विरोध असल्याचे सांगितले आहे. पण त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावरून वेगळीच भूमिका घेतली आहे. त्यांची यावरून पहिली प्रतिक्रिया समोर आल्याने आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

तटकरे यांनी ठाकरे बंधू काढणाऱ्या पाच जुलैच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताच नेता सहभागी होणार नसल्याचे जाहीर केलं आहे. तसेच हिंदी विरोधातील हा मोर्चा विरोधी पक्षाने काढलेला असून याच राष्ट्रवादीला कोणताच रस नाही. तर आमच्या पक्षाच्या ज्या भावना असतील त्या आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना कळवू. त्यांना या विषयातून मार्ग काढण्यासाठी विनंती करू, त्यासाठी प्रयत्न करू असे म्हटलं आहे.

तसेच तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या मोर्चाला दिलेल्या पाठिंब्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवार यांनी आणि त्यांच्या पक्षाने या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्ह नाही. मला याबाबत काहीच बोलण्याचं कारण नाही, राज्यातल्या निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचे ठरले आहे. पण जर कोणाला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल. तर ते घेऊ शकतात. यात आमचा हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उठत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही त्यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Sunil Tatkare Controversy : 'तटकरे भैयुजी महाराजांकडून आघोरी विद्याचे प्रकार करायचे'; शिंदेंचा आमदार अधिकृत कॅसेट बाहेर काढणार

त्याचबरोबर यावेळी तटकरे यांना या मोर्चा आणि त्यानंतर ठाकरे बंधुंमध्ये युती झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसू शकतो अशा चर्चा सुरू आहेत. काय खरचं असे होईल का? असा सवाल करण्यात आला होता.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Sunil Tatkare : स्थानिकच्या तोंडावर भाजप नेत्यानं टायमिंग साधलं; कमळ सोडून हाती बांधलं घड्याळ; तटकरेंचाही सूचक इशारा

यावर तटकरे यांनी, ठाकरे बंधूंच्या या मोर्चाकडे आपण राजकीय दृष्ट्या बघत नाही. लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण या मोर्चाने राज्यात फार मोठा बदल किंवा मराठी मतांचं ध्रुवीकरण होईल असेही वाटतं नाही. येथे महायुतीच मजबूत आहे, असेही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com