NCP Merger Politics : तनपुरेंच्या गौप्यस्फोटावर तटकरेंचा खुलासा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही कबुली; ‘दादां’च्या निधनानंतर...

Sunil Tatkare On NCP Merger Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Sunil Tatkare On NCP merger; Sharad Pawar and Ajit pawar
Sunil Tatkare On NCP merger; Sharad Pawar and Ajit pawar Sarkarnama
Published on
Updated on

Raigad News : राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणास उकळी फुटली असून ते का होऊ शकले नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याची स्पष्ट कबुलीही दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली असून दादाच त्या करत होते. आपण त्या कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो. पण बैठकीचा तपशील दादांकडून सांगितला जात होता. पण आता ती राजकीय स्थिती दादां’च्या निधनानंतर राहिली नसून विलिनीकरण का होऊ शकले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

माध्यामांशी बोलताना तटकरे यांनी याबाबत माहिती दिली असून राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलिनीकरणाबाबत प्रचंड चर्चा झाल्याची स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे. तसेच ‘दादां’च्या निधनानंतर परिस्थिती कशी बदलली आणि विलिनीकरण का होऊ शकले नाही, यावर भाष्य करताना, दादांच्या निधनापूर्वी यावर चर्चा झाल्या होत्या.

Sunil Tatkare On NCP merger; Sharad Pawar and Ajit pawar
NCP merger issue : आम्ही तोंड उघडलं तर बात दूर तक जायेगी, विलीनीकरणाच्या मुद्द्यावर शशिकांत पाटलांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडेबोल

याबाबत आपण याधीही सांगितले आहे की आपण कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो. पण विलिनीकरणाबाबच्या बैठकींचा तपशील दादांकडून मिळत असे. ते याबाबत सांगत असतं. दादा एकटेच याची चर्चा करत होते. तेच आमचे नेते होते. त्यामुळे आम्ही फक्त निर्णयाच्या प्रक्रियेत होतो.

मात्र प्राजक्त तनपुरे यांनी फार मोठा गौप्यस्फोट केलाय असं काही नाही. त्या चर्चांना पवार साहेबांचे आमदारही होते. आता ते चर्चेला उपस्थित असतील तर त्यात गैर काय? यामुळे तनपुरेंचा गौप्यस्फोट वगैरे म्हणता येत नाही, असे म्हणत तनपुरेंचा गौप्यस्फोट त्यांनी खोडून काढला आहे.

यावेळी तटकरे यांनी दादांच्या निधनानंतर विलिनीकरण का होऊ शकत नाही या मुद्द्यात हात घालत राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “दादा गेल्यावर राजकीय परिस्थिती बदलली आहे. दादा असताना होणारे विलिनीकरण आणि दादा गेल्यावर होणारे विलिनीकरण यात खूप मोठा फरक आहे.

Sunil Tatkare On NCP merger; Sharad Pawar and Ajit pawar
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला अखेर फुलस्टॉप! शशिकांत शिंदेंनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, शरद पवारांच्या नेतृत्वातच...

याच स्थितीमुळे विलिनीकरणाचा निर्णय पुढे जाऊ शकला नाही. तसेच पुढच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे ते शक्य झाले नाही असेही स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले आहे. तसेच तटकरे यांनी पार्थ पवारांविषयी बोलताना, दादांच्या निधनानंतर पार्थ पवार सक्रिय होणं हे महत्त्ववाचं होतं. त्या पद्धतीने ते आता सक्रिय झाले आहेत. आता काम करताना काही मते असू शकतात असेही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com