

kolhapur News : विलीनीकरणाचा मुद्दा आमच्यासाठी संपला, असे विधान आमदार शशिकांत शिंदे यांनी केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी "सातत्याने विलीनीकरणाबाबत बोलणारी मंडळी असा का निर्णय घेतला" असे वक्तव्य केले. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी चांगलेच सुनावले.
मंत्री हसन मुश्रीफ भूमिकेचे आश्चर्य वाटते, पण ते ज्येष्ठ नेते आहेत. दादा गेल्यानंतर विलिनीकरण बाबत बातम्या पसरवण्यात आल्या. आणि ते आरोप आमच्यावर झाले. आम्ही आता यावर तोंड उघडले तर बात दूर तक जायेगी, असे विधान शशिकांत शिंदे यांनी करत खळबळ उडवून दिली.
दादा विलीनकरणाची चर्चा करत होते, विलीनीकरण करण्याची त्यांची इच्छा होती. पण दादा गेल्यानंतर आम्हाला गरज आहे, असे दाखवण्यात आले. या सर्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. पण आज स्पष्ट मत आहे. जे दाखवले जातंय ते स्पष्ट व्हावे म्हणून आम्ही निर्णय घेतला. भाजप ज्या पद्धतीने मित्र पक्षाची कोंडी करत आहे. त्याला सावध होत दादांनी हा निर्णय घेतला असावा. त्यामुळे आता विलिनीकरण हा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे, असे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या बांधणी करण्यासाठी कोल्हापूरमध्ये सुरवात करत आहोत. येत्या दीड महिन्यात राज्यात सर्व जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम करणार आहे. पक्ष विलिनिकारण हा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे. पवार साहेबांचा चेहराच पक्षासाठी महत्वाचा आहे. नियोजन आणि निर्णय घेण्यास चूक झाली तर सामान्य जनतेला त्रास होतोय. सरकारचे काही निर्णय चुकले आहेत. कांदा, साखर, निर्यात बंदी केली, त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचे आमदर शिंदे यांनी स्पष्ट केले.
पक्षामध्ये काही विषयावर भिन्नता असू शकते. तितके स्वातंत्र्य आम्ही दिले आहे. पण संकट आणि संघर्षच्या काळात जयंत पाटील यांनी चांगले काम केले. लोकसभा आणि विधानसभा काळात महत्वाचे काम केले. जयंत पाटील आणि पक्षात कोणतेच मतभेद नाहीत. असेही आमदार शिंदे म्हणाले.
पेट्रोल दरवाढ बोलताना, निवडणूक होईपर्यंत कोणतीच दरवाढ केली नाही. अजून काही दिवस 90 पैशाने वाढ करत ही दरवाढ 20 रुपयांपर्यंत वाढेल. सध्याचे राजकारण म्हणजे व्यावसायिक मानसिकता. काहींच्या हातामध्ये व्यवसाय दिला आहे. येत्या काही वर्षात डिपेंड पॉलिसी निर्माण होईल. त्यामुळे लोकांना काही लोकांवरच अवलंबून राहावे लागेल, असा धक्कादायक दावा आमदार शिंदे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.