NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला अखेर फुलस्टॉप! शशिकांत शिंदेंनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, शरद पवारांच्या नेतृत्वातच...

NCP Merger: फुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा ही महाराष्ट्राच्या राजकारणातला गेल्या काही महिन्यांमधला सर्वात कळीचा मुद्दा राहिला आहे. आता अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चांनी अधिक जोर धरला.
Shashikant Shinde
Shashikant Shinde
Published on
Updated on

NCP Merger: फुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा ही महाराष्ट्राच्या राजकारणातला गेल्या काही महिन्यांमधला सर्वात कळीचा मुद्दा राहिला आहे. आता अजित पवारांच्या निधनानंतर या चर्चांनी अधिक जोर धरला. पण अद्यापपर्यंत यावर कुठलाही ठोस हालचाली झालेली नाही. पण यामुळं सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात मात्र संभ्रामवस्था निर्माण झालेली आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आता विलिनिकरणाचा विषय संपलेला असल्याचं अगदीच स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

Shashikant Shinde
'कोकरोच जनता पार्टी'चा संस्थापक कोण? वय, शिक्षण, पार्टीचा अॅक्शन प्लॅन काय?

मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली, या बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, "मी परत एकदा सांगतो की पक्ष संघटना मजबूत करुन फार मोठ्या उमेदीनं पक्ष पुढे चालू नेण्यामध्ये सर्वांचा सहभाग असावा. यामध्ये खासदार, आमदार आणि ज्यांनी निवडणुकी लढवलेल्या आहेत, या सर्वांना बरोबर घेऊन सगळ्यांना वेळ देऊन पक्षामध्ये पूर्णपणे ताकदीनं शरद पवारच्या नेतृत्वामध्ये सक्षम विरोधीपक्ष म्हणून राष्ट्रवादीला उभं करण्याबाबत आमची चर्चा होती. अनेक खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मुद्दे मांडले"

Shashikant Shinde
Modi-Meloni : "मोदी-फडणवीस चोरीचा माल आहेत", काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान; मोदींना म्हणाले, मेलोडीचा पोरखेळ...

विलिनिकरणाचा विषय संपला

"त्यामुळं पहिल्यांदा हे स्पष्ट करतो की, विलिनिकरणाचा विषय आता संपलेला आहे. यापुढे विलिनिकरणाच्या बाबतीत कुठलीही चर्चा होणार नाही. उलट आम्ही सक्षमतेनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचा चेहरा घेऊन महाराष्ट्रासमोर जाणार आहोत, हे आमचं नक्की ठरलेलं आहे. विलिनिकरणाच्या चर्चांमुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होत आहे, त्यामुळं यापुढे मीडियानं कुठल्याही प्रकारचा विलिनिकरणाचा विषय घेऊ नये. यापुढे विलिनिकरणाचा विषय संपलेला आहे, अशी कुठलीही चर्चा पुढे भविष्यात होणार नाही," अशा अगदी स्पष्ट शब्दांत शशिकांत शिंदे यांनी विलिनिकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Shashikant Shinde
Sambhaji Nagar: रिल्सचा आला ऊत! ओवेसींनी फटकारलं तरी MIMच्या नगरसेवकांची चमकोगिरी काही संपेना

पक्षाला पुढे घेऊन जाणार

पक्ष चौकटीतून शिस्तीतून आम्ही सर्वजण व्यवस्थितपणे काम करु. काही जणांच्या काही खंत असतील तर त्यासुद्धा दूर करुन एकत्रितपणे भविष्यकाळात आक्रमकपणे आम्ही आंदोलनं करणार आहोत, संघटना बांधणार आहोत. दोन दिवसांचं आम्ही शिबीर घेतोय, पक्षाच्या बाबतीत भूमिका घेत असताना, चांगल्या पद्धतीनं विरोधीपक्ष म्हणून उभे राहणार आहोत. येत्या काही दिवसांत पक्ष आधी मजबूत करुन कार्यकर्त्याला प्राधान्य द्यायचं तसंच एकवाक्यतेनं एका विचारानं पक्षाच्या चौकटीतून जाण्याचा विचार करु. तसंच स्वतंत्रविचार कोणी मांडत असेल तरी त्याला बरोबर घेऊन त्यांना आम्ही पक्षाची भूमिका स्पष्टपणे चालण्याचा प्रयत्न करु, असंही यावेळी शिंदे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com