Rashtriya Samaj Party News : खळबळजनक! 'रासप'चे उमेदवार गोविंद जेठेवाडा यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Govind Jethewadas attempt to suicide : किनवट विधानसभा मतदारसंघामधून जाहीर झाले आहे उमेदवारी अन् प्रचारही झाला होता सुरू
Govind Jethewada
Govind JethewadaSarkarnama
Published on
Updated on

Rashtriya Samaj Party candidate Govind Jethewada : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस काल होता, त्यामुळे आता सर्वच मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, अद्यापही काही मतदारसंघामध्ये बंडखोरी कायम असल्याने राजकीय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर त्यांचेही आव्हान आहचे. सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जोर लावत आहेत.

दरम्यान, किनवटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे(Rashtriya Samaj Party) किनवट मतदारसंघाचे उमेदवार गोविंद जेठेवाडा यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर, त्यांनी प्रचारही सुरू केला होता. मात्र अचानक त्यांच्याबाबतची अशी बातमी समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Govind Jethewada
Eknath Shinde and Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीसाठी...' ; एकनाथ शिंदेंचं कोरेगावमधील प्रचारसभेत मोठं विधान!

किनवट मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमदेवार गोविदं जेठेवाडा यांनी विषारी औषध प्राशन करून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. यामागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. गोविंद जेठेवाडा यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव होता का? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

सध्या गोविंद जेठवाडा यांना उपचारासाठी तेलंगणातील आदिलाबाद येथे हलवण्यात आले आहे. मात्र त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यांनी असा निर्णय का घेतला, हे जाणून घेण्याची आता सर्वांनाच उत्सुकता आहे.

Govind Jethewada
CM Shinde challenged MVA : '..त्यासाठी आमची समोरासमोर येवून चर्चा करण्याची तयारी आहे' ; एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला आव्हान!

राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडत स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्वत: याबाबत घोषणा केली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत रासप ही महायुतीचा भाग होती. महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेवदारी जाहीर झाली होती.

मात्र यामध्ये त्यांचा शिवसेना(Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय जाधव यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांनीच महादेव जानकरांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com