Modi-Thackeray Solapur Sabha : मोदी अन् ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात; विधानसभेच्या प्रचारात रंगणार राजकीय जुगलबंदी

Assembly Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांसाठीही 12 नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे सभा होणार आहे, त्यामुळे ठाकरे आणि मोदींची जुगलबंदी सोलापूरकरांना पाहायला मिळणार आहे
Uddhav Thackeray-Narendra Modi
Uddhav Thackeray-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 November : उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर राजकीय नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या दहा नोव्हेंबरला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस प्रचारसभा असणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकाच दिवशी सोलापूर जिल्ह्यात सभा होत आहे, त्यामुळे ठाकरे आणि मोदी काय बोलणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आजपासून (ता. 05 नोव्हेंबर) राज्यात प्रचार दौरा सुरू झाला आहे. त्याची सुरुवात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथून केली असून 18 तारखेला वांद्रे पूर्व (मुंबई) येथे त्यांच्या दौऱ्याची सांगता होणार आहे.

उद्धव ठाकरे हे 10 नोव्हेंबर रोजी सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांची पहिली प्रचार सभा ही सांगोला येथे दीपक साळुंखे यांच्यासाठी होणार आहे. सांंगोला मतदारसंघातून मागील निवडणुकीत निवडून आलेले शहाजी पाटील यांनी बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे, त्यामुळे शहाजी पाटील हे ठाकरे यांच्या निशाणावर असणार हे उघड आहे.

शहाजी पाटील यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार’ याला उद्धव ठाकरे हे कशा प्रकारे उत्तर देतात, हे पाहावे लागणार आहे. याशिवाय गद्दारीच्या मुद्द्यावरून ते शहाजी पाटील यांचा समाचार घेण्याची शक्यता आहे. तसेच, महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी मतदारसंघ न सुटल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे, त्यामुळे त्यावर ठाकरे काय बोलणार?, याचीही सांगोल्यात उत्सुकता असणार आहे.

Uddhav Thackeray-Narendra Modi
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत भावाने साथ सोडली, प्रवीण मानेंना दिला पाठिंबा

सांगोल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता सोलापूर दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सोलापुरात सभा होणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून बंडखोरी झाली आहे, त्या बंडखोरीवर ठाकरे काय बोलणार? त्यापूर्वी बंडखोरीचा प्रश्न निकाली निघणार, या याचीही उत्सुकता असणार आहे.

दरम्यान 11 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे हे जळगावच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर 12 तारखेला ते पुन्हा सोलापूरच्या दौऱ्यावर येणार असून सायंकाळी सात वाजता त्यांची बार्शीत सभा होणार आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. मात्र त्यांनीही ठाकरेंची साथ सोडून काँग्रेस, भाजप आणि पुन्हा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा राजकीय प्रवास केला आहे, त्यामुळे राऊतांवर ते काय बोलणार, याचीही उत्सुकता असणार आहे.

Uddhav Thackeray-Narendra Modi
Madha Loksabha : भाजप खासदाराच्या विजयाची जबाबदारी घेतली राष्ट्रवादीच्या बबनदादांनी; दोन लाख मताधिक्क्याची ग्वाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची महायुतीच्या उमेदवारांसाठीही 12 नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे सभा होणार आहे, त्यामुळे ठाकरे आणि मोदींची जुगलबंदी सोलापूरकरांना पाहायला मिळणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com