लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीती पक्षांनीही यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाला राज्यात आपली ताकद वाढवायची असल्याने, अनेक जागांवरून खेचाखेच सुरू असल्याचे दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा निवडणूक कोण लढवणार यावरून मंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) आणि भाजप नेते राजन तेली हे आमनेसामने उभे ठाकल्याचे दिसत आहेत. सावंतवाडी मतदारसंघात भाजपने उमेदवार द्यावा, अशी मागणी राजन तेली यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंकडे केली आणि त्यानंतर तेथील स्थानिक राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली.
राजन तेलींनी(Rajan Teli) सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याने, शिवसेनेच्या गोटातून संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. राजन तेली यांनी वायफळ बडबड बंद करावी, त्यांनी जरी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघामधून दीपक केसरकरच निवडणूक लढवतील तेच महायुतीचे उमेदवार असतील आणि विजयी देखील होतील, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
एवढच नाहीतर ज्या सावंतवाडी मतदारसंघाबाबत राजन तेली बोलत आहेत, तिथे ते उपरे आहेत. त्यांचं सावंतवाडीत कोणतंही वास्तव्य नाही, त्यांना याआधी जनतेने दोनदा त्यांची जागा दाखवली आहे. त्यामुळे आता त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते व्यर्थ ठरतील. असं शिंदेच्या शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणत आहेत.
एकूणच आगामी काळातील विधानसभा निडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अन्य जागांसोबतच सावंतवाडी मतदारसंघाबाबतही खेचाखेची होऊ शकते, असं चित्र दिसत आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.