

BJP vs AIMIM clash : 'AIMIM'च्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी 'कैसा हराया', 'मुंब्रा हरा बना देंगे', या विधानावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी भाजप अन् त्यांच्याशी संलग्न असलेल्या हिंदुत्वादी संघटना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यावरून चांगलेच आक्रमक झाले.
प्रकरण मुंब्रा पोलिसांपर्यंत गेले. तिथं सहर शेख यांनी नोटीसवर जबाब देताना, माफीनामा दिल्याच पोलिसांचा दावा आहे. आता यात 'AIMIM'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एन्ट्री घेत, हिंदुत्ववादी भाजप सरकारला अंगावर घेतलं आहे.
'AIMIM' प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील ठाण्यात मुंब्रा इथं येत 'AIMIM'च्या विजयी उमेदवारांची भेट घेतली. इम्तियाज जलील यांनी यासाठी घेतलेली एन्ट्री चर्चेत आली. त्यांनी भगवी शाल घालून ते मुंब्रा इथल्या कल्याण फाटा इथं पोहोचले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सत्तेतील हिंदुत्ववादी सरकारला ललकारलं.
इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) म्हणाले, "सहर शेख जे काही बोलल्या, त्याचा अर्थ म्हणजे, सर्वत्र हिरवळ करायची, असा होतो. हिरवा काय आतंकी शब्द आहे का? भाजपचे लोकं गुंड-मवाली आहेत. जसं काय एक दहशतवादी आलाय, असं सहरच्या विरोधात बोललं जात आहे." एक नाचणीया आहे, जी रोज मुस्लिम विरोधात बोलते, असा टोला किरीट सोमय्या यांचं नाव न घेता इम्तियाज जलील यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सहर शेख यांच्या विधानावर जोरदार प्रतिक्रिया दिली होती. सहर शेख अन् त्यांचे वडील युनूस शेख यांना शिंदेंनी बोलावून घेतलं होतं. त्यावर इम्तियाज जलील म्हणाले, "ते बोलले भगवा आहे, तर योग्य आहे, सहर हिरवा बोलली, तर अयोग्य आहे. शिंदेंविरोधात मी तोंड उघडले, तर ते अडचणीत येतील. त्यांनी मी एकच सांगतो की, भाजप कधी तुम्हाला फेकून देईल, हे बघा. " आमदार, खासदार, मंत्री असून पण एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा जास्त जागा आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आल्यात, असा टोला इम्तियाज जलील यांनी लगावला.
इम्तियाज जलील यांनी आमदारच काय इथं खासदार देखील 'AIMIM' निवडून आणू, असा ठणकावून सांगितलं. सहर शेख यांचे विधान म्हणजे, हिंदू लोकांना धमकावले हे कोणत्या आधारे ते बोलत आहेत, असा सवाल करताना, 'AIMIM' ने इथं हिंदू विजय उबाळे याला आम्ही मुंबईत गटनेता बनवला आहे, याकडे लक्ष वेधले. तसेच भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या, पहिले हरे को निपटायेंगे, बाद ने निले को देखते है, या विधानावर ही त्यांची रणनीती आहे, असा टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.