Thane Politics : ठाण्यातील परिवहन कार्यक्रमाला भाजप नेत्यांची दांडी, गणेश नाईक म्हणतात; 'निमंत्रण पत्रिकेवर नाव आलं म्हणजे...'

Ganesh Naik On BJP Leader Absence In Thane Transport Event : ठाण्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला असून परिवहन विभागाच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमावरून आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
Thane Transport Event; Ganesh Naik
Thane Transport Event; Ganesh Naik sarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाण्यात आयोजित परिवहन विभागाच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला भाजपच्या एकाही नेत्याने हजेरी लावली नाही. निमंत्रण असूनही, प्रमुख अतिथी म्हणून अपेक्षित असलेले भाजप नेते गणेश नाईक या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांसह भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली. यावरून आता भाजप नेते गणेश नाईक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्याला आमंत्रण आलं नसल्याचं सांगितलं आहे.

परिवहन विभागाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता समारंभ ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. तर या वेळी अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंत्री गणेश नाईक आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच भाजपचे स्थानिक आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आणि आमदार माधवी नाईक यांना देखील बोलावण्यात आले होते.

Thane Transport Event; Ganesh Naik
Thane Politics : 'क्लस्टर'वरून महायुतीत ठिणगी; भाजपचा विरोध डावलून शिवसेनेकडून प्रस्ताव मंजूर

मात्र, कार्यक्रमाला भाजपच्या कोणत्याही आमदाराने हजेरी लावली नाही. तसेच मंत्री गणेश नाईक यांच्यासह परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील दांडी मारली. या अनुपस्थितीवरून आता महायुतीतील कथित मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले असून, राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, आता यावर गणेश नाईक यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांनी आपल्याला आमंत्रण आलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. परिवहन विभागाच्या कार्यक्रमाकडे भाजप नेत्यांसह आमदारांनी पाठ फिरवली होती. यावरून गणेश नाईक यांना विचारलं असता, त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच गणेश नाईक यांनी निमंत्रण पत्रिकेवर नाव असणे म्हणजे आमंत्रण नाही, असेही म्हणत शिवसेनेच्या नेत्यांना फटकारले आहे.

Thane Transport Event; Ganesh Naik
Thane Politics : शिवसेनेकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम, अवघ्या 3.5 कोटींचा निधी देत कोंडी; उपमहापौर कृष्णा पाटील आक्रमक

या कार्यक्रमाला गैरहजर राहण्यावर बोलताना, मला ज्या ठिकाणी सन्मानाने बोलावले जाते, तेथे मी प्रोटोकॉलप्रमाणे जातो. पण त्या कार्यक्रमाला कोणी का नाही गेलं, ते मला माहीत नाही. मात्र, मला आमंत्रण आलं नाही. तर निमंत्रण पत्रिकेवर नाव असतं म्हणजे आमंत्रण पोहोचलं असं होत नाही. मानसन्मानाच्या गोष्टी करून वादविवाद वाढवण्यापेक्षा समाजाकरता आपल्याला काम करायचं आहे. तो कार्यक्रम झाला, याचा आनंद असल्याचेही गणेश नाईक यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com