Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : विनायक राऊतांनी अडवली भास्कर जाधवांची वाट; चिपळूण शासकीय विश्रामगृहावर नेमकं काय घडलं?

Shivsena UBT Politics Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव हे दोन नेते आहेत. दोघेही जिल्ह्यात पक्ष वाढवण्याचा काम करतात.
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Chiplun News : सध्या ठाकरे गटाला कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक नेते शिवसेनेचं शिवबंधन तोडून महायुतीच्या वाटेवरून राजकीय वाटचाल करत आहेत. तर अनेक शिवसैनिक आता त्या तयारीत आहेत. अशातच चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या एका माजी खासदारानेच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची वाट अडविल्याची माहिती आता समोर आली आहे. ज्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

गुहागरचे आमदार भास्कर जाधव चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी निघाले असताना हा प्रकार घडला. भास्कर जाधव निघाले असतानाच माजी खासदार विनायक राऊत तेथे अगोदरच दाखल झाले. त्यामुळे आमदार जाधवांनी मार्ग बदलला. ते बाळासाहेब माटे सभागृहात गेले. त्यामुळे आमदार जाधवांची वाट माजी खासदार विनायक राऊत यांनी अडविल्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू होती.

जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव हे दोन नेते आहेत. दोघेही जिल्ह्यात पक्ष वाढवण्याचा काम करतात. मात्र दोघांची कार्यपद्धती पाहता दोघेही स्वतंत्रपणे काम करत असल्याचे दिसते. सार्वजनिक कार्यक्रम वगळता हे दोघे नेते एकत्र आल्याचे फार क्वचित घडते. महाराष्ट्रात शिवसेना बळकट करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav News: ...अन् उद्धव ठाकरेंची मुलुखमैदानी तोफ असलेले भास्करराव जाधव ढसाढसा रडू लागले!

भास्कर जाधव यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भाची जबाबदारी आहे. त्याभागातील पक्षाचे पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी चिपळूणला येतात. आमदार जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे ते एक दिवस गुहागरच्या विश्रामगृहावर तर दुसऱ्या दिवशी चिपळूणच्या विश्रामगृहावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी येतात.

आज ही त्यांनी चिपळूण येथील विश्रामगृहावर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सकाळची वेळ ठेवली होती. सोशल मिडियावर तसा संदेशही फिरवण्यात आला होता. भास्कर जाधव विश्रामगृहावर येण्यापूर्वीच माजी खासदार विनायक राऊत रविवारी रात्री विश्रामगृहावर दाखल झाले. तिवरे येथील कुणबी समाजाच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी आज सकाळी विश्रामगृहावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या.

यावेळी आमदार भास्कर जाधव विश्रामगृहावर आले असता त्यांना राऊत विश्रामगृहावर असल्याचे समजले. यावेळी त्यांनी आपला मोर्चा कापसाळ येथील बाळासाहेब माटे सभागृहाकडे वळविला. त्यामुळे विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांची विश्रामगृहाकडे जाणारी वाट अडवल्याची मिश्किल चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

भास्कर जाधव पक्षाचे नेते आहेत. आम्ही दोघेही पक्षाचे करत आहोत. संघटनात्मक बाबींवर आमची नेहमी चर्चा होत असते. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यांना मतदार संघातील कार्यकर्त्यांना भेटायचे होते. विश्रामगृहाची जागा लहान आहे. त्यामुळे ते माटे सभागृहात गेले असतील असे स्पष्टीकरण रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांना आता कसली चिंता? थेट मनसेच्या जिल्हाध्यक्षानेच धरली छत्री? नेमकं कारण काय?

तर आमदार भास्कर जाधव यांना भेटण्यासाठी आलेले कार्यकर्ते सुद्धा राऊत यांच्या दरबारात बसले होते. मात्र भास्कर जाधव दिसत नसल्यामुळे तेही गडबडले. विनायक राऊत प्रत्येकाला येण्याचे कारण विचारायचे तेव्हा आमचे भास्कर जाधव यांच्याकडे काम आहे. असे कार्यकर्ते सांगायचे तेव्हा विनायक राऊत आणि विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम त्यांना माटे सभागृहात जाण्याची विनंती करायचे. कापसाळच्या विश्रामगृहावर भास्कर जाधव दिसत नसल्यामुळे काही कार्यकर्ते थेट जाधवांना तर काही जण त्यांच्या स्वीय सहाय्यकाला फोन करून विश्रामगृहावरून माघारी फरताना दिसले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com