Palghar Politics : पालघरमध्ये ट्विस्ट; वेळोवेळी महायुतीला मदत केलेल्या बविआने दिला उमेदवार? राजेश पाटलांनी भरला अर्ज...

Lok Sabha Election 2024 : बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल...
Palghar News
Palghar NewsSarkarnama

Palghar News : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आज शुक्रवारी 26 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. बहुजन विकास आघाडीने अजूनपर्यंत अधिकृत उमेदवार घोषित केली नसली तरी राजेश पाटील यांच्या नावावर एकमत झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज अचानकपणे शक्तिप्रदर्शन न करता वसई पालघरमधील ठराविक कार्यकर्त्यांना घेऊन राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. बहुजन विकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन हे तीन मे रोजी करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. (Latest Marathi News)

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी अधिकृतपणे उमेदवाराची घोषणा केली नसली तरी इच्छुकांनी मात्र एक मताने राजेश पाटील यांच्या नावाची शिफारस काल केल्याच्या पार्श्वभूमीवर आज अचानकपणे राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र अजूनही कहानीमध्ये काही ट्विस्ट येतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आज हितेंद्र ठाकूर यांची सायंकाळी पत्रकार परिषद होत असून, ठाकूर हे राजेश पाटील यांचे नाव जाहीर करून सस्पेन्स संपवतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांनी अजून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, वसई-विरारचे माजी उप-महापौर उमेश नाईक, नितीन भोईर, प्रभाकर पाटील, ठाणे जिल्हा बँकेचे राजन पाटील, पक्ष प्रवक्ते अजीव पाटील, पंकज ठाकूर व इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

मतदारसंघाची मला ओळख -

"आपण विकास कामावर ही निवडणूक लढवित आहोत कोणावरही टीका टिप्पण्णी न करता आपला प्रचार सुरू राहणार आहे, बोईसर विधानसभा क्षेत्रात बरीच विकासकामे आपल्या हातून झाली आहे. जिल्ह्यातील आदिवासी व इतर समाजाच्या कोणत्या समस्या आहेत त्याची जाणीव मला आहे, त्या सोडविण्यासाठी मी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या मार्गदर्शनाखाली आपले कार्य सुरू राहणार आहे. मी सर्व तालुक्यांचा अभ्यास केलेला आहे व सर्व तालुक्यात फिरलो आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे मी निवडणूक लढवीत आहे, असे राजेश पाटील यांनी सांगितले.

Palghar News
Sharad Pawar NCP Manifesto: पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? पवार गटाचा 'शपथनामा' प्रसिद्ध होताच भाजपची टीका
Palghar News
BJP Vs Congress: मोदींचा एकेरी उल्लेख करणं राहुल गांधींना अशोभनीय, त्यांनी औकातीत राहावं; भाजपची घणाघाती टीका

महायुतीत संभ्रम -

पालघर लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित न झाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूने जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी भाजपचा उमेदवार या मतदारसंघात असावा यासाठी आग्रही आहेत तर दुसऱ्या बाजूने शिवसेना शिंदे गटही आपल्याच उमेदवारासाठी अर्थात राजेंद्र गावित यांच्यासाठी आग्रही आहेत. मात्र, उमेदवाराची घोषणा होत नसल्यामुळे दोघांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आता ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरल्यानंतरच घोषित होईल, अशी शक्यता निर्माण झाली

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com