Narayan Rane : भाजप-शिवसेना युतीत फूट? “शिंदेंसोबत संबंध तोडू”, राणेंचा इशारा; “आम्ही हतबल नाही” म्हणत शिंदेंच्या शिलेदाराचाही पलटवार

Shivsenas Alliance Plan : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काही ठिकाणी महायुती नाही तर विरोधकांशी हातमिळवणी होण्याती शक्यता आहे.
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेने कोकणात राजकीय तापमान वाढले आहे.

  2. नारायण राणेंनी शिंदे गटासोबत संबंध तोडण्याचा इशारा दिल्याने भाजप-शिंदे युतीत मतभेद उफाळले आहेत.

  3. उदय सामंत यांनी पलटवार करत “आम्ही हतबल नाही” असे ठाम वक्तव्य केले आहे.

Sindhudurg News : कोकणातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपला शह देण्यासाठी एकनाश शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोठी राजकीय रणनीती आखली जात आहे. यासाठी थेट विरोधक असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी बोलणी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. याच चर्चेवरून आता येथे राजकीय वातावरण तापले असून भाजप खासदार नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जर तसं असेल तर आम्ही शिंदेंसोबत या दोन जिल्ह्यात संबंध तोडू, असाच इशारा दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ता राखण्यासाठी महायुतीबरोबरच महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. सध्या युती असो किंवा मविआ यांच्यात अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. तोच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्याला नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार राजन तेली यांनी सगळे एकत्र येणार असल्याचं म्हणत एक प्रकारे दुजोराच दिला आहे. त्याच्या याच स्पष्टीकरणानंतर आता कोकणासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून जर असं असेल तर आम्ही शिंदेंसोबत या दोन जिल्ह्यातील संबंध तोडू असा इशारा दिला आहे. राणे यांनी, मी राजन तेली याला कुठलाही नेता आणि पदाधिकारी मानत नाही, राजन तेली आणि विशाल परब या दोन माणसांचा भाजपसोबत संबंध मानत नाही. कुठल्याही म्हणण्याला मी विरोध करेल. विशाल परब याने भाजपवर टीका केलीये, तो भेटू दे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. फक्त मतदारसंघातच नाही तर जिल्ह्यात युती झालीच पाहिजे, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Narayan Rane
Narayan Rane News: वेळ बदलली..! नारायण राणेंना पाडणाऱ्या तडफदार महिला नेत्याचा आता राज ठाकरेंना धक्का; भाजपमध्ये पुन्हा 'एन्ट्री'

तसेच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र काम करतायेत. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवली, मग इथे आता कसं काय झालं? पालकमंत्री आणि चव्हाणांनी बैठक घेऊन आमदार आणि खासदारांची काय इच्छा आहे पाहावं, असाही सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यावर शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. त्यांनी,'सिंधुदुर्गात आमचे दोन आमदार आहेत, आम्ही संयम ठेवला आहे याचा अर्थ आम्ही हतबल नाही, असे सुनावले आहे. तसेच एकाआर्थी स्वबळाची तयारी असल्याचेही सांगितले आहे.

यावेळी सामंत यांनी, लोकसभा आणि विधानसभा आम्ही एकत्र लढलो. पण आता कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या निवडणुकीला स्वबळावर लढण्याची सध्या भाषा केली जातेय. हे फक्त स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठीच केलं जात आहे. पण ही नीती कार्यकर्त्यांमध्ये कटूता निर्माण करणारी असून ती अशीच आगामी खासदारकी आणि आमदारकीला राहू शकते. त्यामुळे आमची लवचिक नाही पण नरमाईची आणि संयमी भूमिका आहे. पण याचा अर्थ आम्ही हतबल नाही, असाच इशारा उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे.

Narayan Rane
Narayan Rane : नारायण राणेंचा एकच दम : उदय सामंत, निलेश अन् नितेश राणेंचं स्वबळाचं विमान झटक्यात जमिनीवर

FAQs (Marathi)

1. दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेवर नारायण राणेंनी काय प्रतिक्रिया दिली?
राणेंनी इशारा दिला की, जर अशी युती झाली तर भाजप शिंदे गटाशी संबंध तोडेल.

2. उदय सामंत यांनी यावर काय म्हटले?
उदय सामंत यांनी म्हटले की, “आम्ही हतबल नाही,” असा ठाम पलटवार त्यांनी केला.

3. या वादामुळे कोणत्या पक्षांमध्ये मतभेद वाढले आहेत?
भाजप आणि शिंदे सेनेतील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत.

4. हा वाद कुठल्या पार्श्वभूमीवर उफाळला?
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिंदे सेना विरोधकांशी युती करण्याच्या चर्चेमुळे हा वाद निर्माण झाला.

5. या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या वादामुळे महायुतीमध्ये फूट पडण्याची आणि कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com