Narayan Rane : नारायण राणेंचा एकच दम : उदय सामंत, निलेश अन् नितेश राणेंचं स्वबळाचं विमान झटक्यात जमिनीवर

Narayan Rane Ratnagiri Politics : भाजप खासदार नारायण राणे यांनी नुकताच रत्नागिरी जिल्ह्यात जनता दरबार घेत आगामी स्थानिकच्या मोर्चेबांधणीला वेग दिला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
sarkarnama
sarkarnamasarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. भाजप नेते नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये सुरू असलेल्या “स्वबळाचा नारा” मोहिमेवर नाराजी व्यक्त केली.

  2. त्यांनी नितेश आणि निलेश राणे या दोघांनाही फटकारत, “पालकमंत्री म्हणजे सर्वकाही नाही” असा इशारा दिला.

  3. राणेंनी स्पष्ट केले की, पक्ष युतीबाबत अंतिम निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेतील, स्थानिक नेते नाहीत.

Ratnagiri News : भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरीत आगामी स्थानिकची मोर्चे बांधणी केली. यासाठी त्यांनी जनता दरबार घेतले. या माध्यमातून काही महत्वाचे पक्षप्रवेशही यावेळी झाले. यावेळी त्यांनी 1 नोव्हेंबरला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्च्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उदय सामंत यांनाही फटकारलं आहे.

नारायण राणे यांनी रत्नागिरीतील चिपळूणमध्ये जनता दरबार घेत जनतेचे प्रश्न जाणून घेतले. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या तळकोकणात गाजणाऱ्या मुद्द्याला थेट हात घालत आपल्या दोन्ही मुलांना फटकारले आहे. पालकमंत्री नितेश राणे आणि शिवसेना आमदार जेष्ठ सुपुत्र आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात असो किंवा कोकणात असो, जिथे महायुती आहे तिथे आगामी निवडणुकांमध्ये युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त वरिष्ठांना आहे. पक्षासाठी हितकारक असेल तो घेतला जाईल. तो निर्णय माझ्यासहित सर्वांना बंधनकारक असेल. यावरून पत्रकारांनी त्यांना पालकमंत्री स्वबळाचा नारा देत आहेत. शिवसेना आमदार निलेश राणेही स्वबळाची भाषा करत असल्याचे सांगताच ते म्हणाले, पालकमंत्री म्हणजे सर्वकाही नाही. हा अधिकार त्यांना नाही. कोणत्याही पालकमंत्र्याने अशा पद्धतीने निर्णय घेवू नये. युतीबाबत जो निर्णय पक्ष देईल तो निर्णय शेवट असेल असेही त्यांनी म्हटलं आहे.

sarkarnama
Narayan Rane : शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचा जनता दरबार! राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस ‘धडाकेबाज’ डाव खेळण्याच्या तयारीत

राज्यात होणाऱ्या मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात महाविकास आघाडीने रणनीती आखत 1 नोव्हेंबरला राजधानीत भव्य मोर्चा काढणार आहे. यात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष व इतर विरोधी पक्ष मिळून बोगस मतदार याद्या सकट घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला विरोध करणार आहेत.

यावरून राणे यांनी तोफ डागताना कुठली महाविकास आघाडी? लोकांसाठी काय काम करतात हे? उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी त्यांच्या काळात काय काम केले? आता निवडणूक आली आहे म्हणून हे बाहेर पडले आहेत. तर आपल्याला काही मिळते का? आपल्या पत्रावळीवर काही भाजी पडते का? यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांचे पक्ष संपल्याची खरमरीत टीका नारायण राणे यांची केली आहे.

तर सध्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नागपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्यावर देखील टीका करताना कोण बच्चू कडू? असा सवाल केला आहे. तसेच कडू यांच्यामध्ये काय ताकद आहे? घोषणा दिली म्हणजे आंदोलक होते का? असाही निशाना त्यांनी साधला आहे. तर यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच वेळी दोन मुलं राजकारणात असून दोघेही सत्तेत आहेत. एक पालकमंत्री तर दुसरा आमदार आहे. या दोघांपैकी कोण चांगले काम करतो असा सवाल पत्रकारांनी केला असता ते चांगलेच भडकले. तर या प्रश्नाला उत्तर देताना, 'तुम्ही आग लावायचे काम करू नका' असे उत्तर नारायण राणे यांनी दिले आहे.

यादरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना राहिली नाही, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यांचे एक सुपूत्र (निलेश राणे) याच शिवसेनेत आमदार असून त्यांनी भाजपविरोधात दंड फोपाटले आहे. निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. तर त्यांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांची शिवसेना हीच आमची खरी शिवसेना असल्याचा दावा करतात.

पण आता राणे यांनी आगामी निवडणुकीच्या आधी रत्नागिरीत थेट उतरत शिवसेना नेते उदय सामंत आणि बंधू किरण सामंत यांच्याविरोधात मोर्चेबांधणीची तयारी केली आहे. याचवेळी त्यांनी आजची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, असे म्हणत निशाना साधला आहे. नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

sarkarnama
Narayan Rane : नारायण राणेंचं हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता झालं अन्... काय होता यंत्रणांना घाम फोडणारा प्रसंग?

FAQs :

1. नारायण राणेंनी कोणावर टीका केली आहे?
त्यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या स्वबळाच्या घोषणेवर टीका केली आहे.

2. त्यांनी काय विधान केले?
राणेंनी सांगितले की “पालकमंत्री म्हणजे सर्वकाही नाही” आणि युतीबाबत निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

3. हा वाद कोणत्या पार्श्वभूमीवर झाला?
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संभाव्य युतीबाबत मतभेद निर्माण झाले होते.

4. या वक्तव्यामुळे कोणावर दबाव आला आहे?
नितेश आणि निलेश राणे यांच्यावर राजकीय दबाव निर्माण झाला आहे.

5. पुढील राजकीय परिणाम काय होऊ शकतात?
या विधानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या स्थानिक नेतृत्वात मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com