Narayan Rane News: वेळ बदलली..! नारायण राणेंना पाडणाऱ्या तडफदार महिला नेत्याचा आता राज ठाकरेंना धक्का; भाजपमध्ये पुन्हा 'एन्ट्री'

BJP Political News: मुंबई महापालिका गेल्या 25 वर्षांपासून एकसंध शिवसेनेच्या ताब्यात होती. आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपला सत्ता मिळवण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून भाजपने निवडणुकीचे प्लॅनिंग सुरु केले आहे.
Narayan Rane
Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : खासदार नारायण राणेंचा 2015 च्या पोटनिवडणुकीत पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांनी माजी आमदार तृप्ती सावंत यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. याच लढतीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळवलेल्या नारायण राणेंना (Narayan Rane) सुमारे 20 हजार मतांच्या फरकानं पराभव झाला होता. आता याच तृप्ती सावंत यांच्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. त्यांनी 2019 ची निवडणूक अपक्ष लढल्याने शिवसेनेला फटका बसला होता. पक्षाचे वांद्रे पूर्वचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तर झिशान सिद्दीकी निवडून आले होते. यानंतर सावंत यांनी 2021 मध्ये भाजपात प्रवेश केला होता.

यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीत वांद्रेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली. त्यामुळे तृप्ती सावंत यांनी संधी हेरली. विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीआधी माजी आमदार तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत भाजपला (BJP) मोठा धक्का दिला होता.

मनसेकडून तृप्ती सावंत वांद्रे पूर्व मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली होती. पण या निवडणुकीत मुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी उमेदवार यांच्यासह मनसेकडून तिकीट मिळवलेल्या सावंत यांच्यात तिरंगी लढत झाली. पण तृप्ती सावंत यांच्यासह झिशान सिद्दीकी यांनाही पराभवाचा धक्का देत वरुण सरदेसाई यांनी बाजी मारली.

Narayan Rane
Ajit Pawar News : जमीन व्यवहार प्रकरणातील सर्वात मोठी बातमी : अजित पवारांनीच दिली माहिती; म्हणाले, एक रुपयाही दिला गेला नाही...

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच आता तृप्ती सावंत यांनी मनसेला रामराम ठोकत आता पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तृप्ती सावंत यांना पक्षात आणत आता भाजपनं राज ठाकरेंनी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेलाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत तृप्ती सावंत यांच्या पक्षप्रवेशानं भाजपनं मोठी खेळी खेळल्याचं दिसून येत आहे.

मुंबई महापालिका गेल्या 25 वर्षांपासून एकसंध शिवसेनेच्या ताब्यात होती. आता शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर भाजपला सत्ता मिळवण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून भाजपने निवडणुकीचे प्लॅनिंग सुरु केले आहे. त्यातच आता मुंबई भाजपच्या नेतृत्वात आणि कार्यकारिणीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे मुंबईच्या राजकारणावर काय परिणाम होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Narayan Rane
Ajit Pawar News: अजित पवार CM फडणवीसांच्या भेटीनंतर पार्थ पवार सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; वादग्रस्त जमीन...

हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचे प्लॅनिंग बदलले आहे. त्यामुळेच आता येत्या काळात मुंबई भाजपमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे.

येत्या काळात मुंबई भाजपची नवीन कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. त्यात आता आमदारांना सरचिटणीस आणि महामंत्री यांसारखी महत्त्वाची पदे दिली जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बदलांनुसार, सामान्य कार्यकर्त्यांना संघटनेत अधिक संधी दिली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com