शरद पवारांचा शिलेदार भाजपने फोडला, उदय सामंतांनी थेट इशाराच दिला; नितेश राणेंच्या आरोपावरही हल्लाबोल, म्हणाले, 'कुठे काय...'

Uday Samant On Prashant Yadav And Nitesh Rane : शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रशांत यादव यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना भाजपला इशारा दिला आहे. तसेच जिल्हा नियोजन निधी वाटपावरून मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या आरोपवरही पलटवार करताना सिंधुदुर्गातील राजकारणात याचे पडसाद उमटतील, असेही संकेत दिले आहेत.
Uday Samant, Prashant Yadav And Nitesh Rane
Uday Samant, Prashant Yadav And Nitesh Ranesarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • उदय सामंत यांनी प्रशांत यादव यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना “काळ ठरवेल ताकद कोणाची” असे विधान केले.

  • नितेश राणेंनी पालकमंत्र्यांवर जिल्हा नियोजन निधी वाटपात दुजाभावाचा गंभीर आरोप केला.

  • सिंधुदुर्गात या वादाचे पडसाद उमटून महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मतदार संघात सध्या महायुतीतच राजकारण तापलं आहे. अजून विधान सभेला 4 वर्षांचा अवधी असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात येथे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दंड थोपाटले आहेत. विद्यमान आमदार यांना टक्कर देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत यादव भाजपच्या वाटेवर असून ते मंगळवारी (ता.19) प्रवेश करणार आहेत. या दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत जावून चिपळुणात आगामी आमदार हा भाजपचाच असेल असे वक्तव्य केले. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर जिल्हा नियोजन निधी वाटपात दुजाभावाचा आरोप केला होता. यावर आता शिवेसनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रशांत यादव यांच्या प्रवेशावर, ते कुठेही गेले तरी त्याचे उत्तर येणारा काळच ठरवेल असे म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिपळूणमधील नेते प्रशांत यादव भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला भगदाड पडल्याचे तर भाजपने शिवसेनेचा नेता पळवल्याचे बोलले जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या संपर्कात प्रशांत यादव होते. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. मात्र ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मंत्री नितेश राणेंनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी उदय सामंत जिल्हा नियोजन निधी वाटपात दुजाभावाचा करत असल्याचा आरोपही केला होता. तसेच आपण देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असून याचे पडसाद तिथेही उमटतील, असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता. तसेच स्थनिकसाठी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला होता. यामुळे तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

Uday Samant, Prashant Yadav And Nitesh Rane
Uday Samant : उदय सामंतांनी भाजपला पुन्हा डिवचलं, एकनाथ शिंदेंमुळेच महाराष्ट्रात महायुतीची सत्ता!

अशातच आता सामंत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत यादव यांच्या प्रवेशाच्या चर्चेवर ते म्हणाले, कोणी कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. पण ते कुठेही गेले तरी त्याचे उत्तर येणारा काळच ठरवेल. कोणाची किती ताकद आहे हे देखील येणाऱ्या काळात दिसेल, असे नितेश राणेंनी केलेल्या दाव्यावर ते म्हणाले आहेत.

जिल्हा नियोजन निधीवाटपातील दुजाभावाच्या आरोपावर कोणतेही उत्तर दिलेले नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी, निवडणुकांसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षांची समन्वय समिती आहे. त्या समितीमध्ये मी स्वतः आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी रत्नागिरी जिल्ह्यासंदर्भात आपली दोन तास चर्चा झाली आहे.

मागील टर्ममध्ये जिल्हा परिषदेत भाजपचा एकही सदस्य नव्हता. चव्हाण यांना याची माहिती आहे. महायुती म्हणून मित्रपक्षाचा सन्मान ठेवला जाईल. समन्वय समितीत काय चर्चा होते, हे समिती सदस्यांनाच माहीत असते. बाहेरच्यांना त्याची माहिती नसते. कार्यकर्त्यांचा जोश वाढवण्यासाठी नितेश राणे यांनी स्वबळाचा नारा दिला असेल तर त्याची आपल्याला कल्पना नाही. मी चारवेळा मंत्री झालो आहे. त्यामुळे कुठे काय बोलायचे याचे ज्ञान मला असल्याचे सांगत नितेश राणे यांना सामंत यांनी टोला लगावला आहे.

नितेश राणेंचा दावा...

नितेश राणे यांनी, मागील विधानसभा निवडणुकीत प्रशांत यादव अवघ्या 6800 मतांनी पडले होते. पण आता ते भाजपमध्ये प्रवेश करत असून त्यांना येत्या पाच वर्षांत पक्षाकडून ताकद दिली जाईल. त्याच्या जोरावर ते 2029 ची विधानसभा निवडणूक लढवतील. ते चिपळूण मतदारसंघातून आमदारही होतील, असा दावा नितेश राणे यांनी केला होता. तसेच त्यांनी येथील कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेतही दिले.

सरकारला समजून घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आले आहे, जे न्यायालयात टिकलेले आहे. सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यास तयार आहे; पण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, अशीही सरकारची भूमिका आहे. या संदर्भात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना शासनाची भूमिका समजून घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Uday Samant, Prashant Yadav And Nitesh Rane
Uday Samant : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेच व्हावेत, 'हीच सामंताची इच्छा' पण म्हणाले निर्णय..

FAQs :

प्र.१: उदय सामंत यांनी काय विधान केले?
उ: त्यांनी प्रशांत यादव यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना “काळ ठरवेल ताकद कोणाची” असे म्हटले.

प्र.२: नितेश राणेंनी कोणता आरोप केला?
उ: त्यांनी पालकमंत्र्यांवर जिल्हा नियोजन निधी वाटपात दुजाभावाचा आरोप केला.

प्र.३: या वादाचा परिणाम कुठे होऊ शकतो?
उ: सिंधुदुर्गातील राजकारणावर याचे पडसाद उमटतील, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com