

उद्योगमंत्री उदय सामंत आणि ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक हे चिपळूण तालुक्यातील खरवते येथे लग्नसमारंभात एकत्र दिसले.
दोन्ही नेते एकत्र स्नेहभोजन करताना दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
मात्र ही भेट पूर्णपणे वैयक्तिक असल्याचे सांगत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
Chiplun political news : उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक एका लग्नसमारंभानिमित्त एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेते एकत्र स्नेहभोजन करताना दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले; मात्र ही भेट पूर्णपणे वैयक्तिक असल्याचे सांगत उदय सामंत यांनी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले. तर प्रवेशाची चर्चा पुरणपोळी किंवा मोदक खाताना होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण या व्हारयल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओमुळे आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
चिपळूण तालुक्यातील खरवते येथे लग्नसमारंभानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते. ‘आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत त्यामुळे मित्र म्हणून भेटलो आणि एकत्र जेवलो’, असे सांगून उदय सामंत म्हणाले की, आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यासाठी एकत्र आलो.
हा राजकारणविरहित कार्यक्रम आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताईदेखील येथे उपस्थित आहेत. पालकमंत्री म्हणून मी देखील उपस्थित आहे. वैभव नाईक हे माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. राजकारणापलीकडे आमची मैत्री आहे. आम्ही मैत्री राजकारणात आणली नाही.
आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतो, हाच आदर्श अनेकांनी घेणे गरजेचे आहे. आम्ही एकत्र जेवायला बसलो याचा अर्थ ते आमच्या शिवसेनेत आले असा होत नाही. ते शिवसेनेत आले तर स्वागतच आहे. प्रवेशाची चर्चा पुरणपोळी किंवा मोदक खाताना होत नाही. त्याला वेगळी बैठक करावी लागते, वेळ आली तर ती बैठक करू, असे त्यांनी म्हटले आहे.
पुरावे असतील तर द्यावेत
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला झालेला विमान अपघात हा वैमानिकाचा वापर करून घडवून आणलेला घातपात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत विचारले असता उदय सामंत म्हणाले की, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते तपास यंत्रणेला, सरकारला देतील. जय पवार आणि रोहित पवार यांच्या केसालादेखील धक्का लागणार नाही, याची सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
1. उदय सामंत आणि वैभव नाईक कुठे एकत्र आले होते?
चिपळूण तालुक्यातील खरवते येथे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात ते एकत्र दिसले.
2. या भेटीमुळे राजकीय चर्चा का रंगल्या?
वेगवेगळ्या राजकीय गटांचे नेते एकत्र आल्याने संभाव्य राजकीय चर्चांचा अंदाज व्यक्त केला गेला.
3. उदय सामंत यांनी काय स्पष्टीकरण दिले?
ही भेट पूर्णपणे वैयक्तिक असून कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
4. पुरणपोळी आणि मोदक संदर्भात त्यांनी काय म्हटले?
प्रवेशाची चर्चा पुरणपोळी किंवा मोदक खाताना होत नाही, असे त्यांनी विनोदी पद्धतीने स्पष्ट केले.
5. या भेटीचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे का?
सध्या तरी ही भेट राजकारणविरहित असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून कोणताही राजकीय परिणाम नसल्याचे सांगितले गेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.