Uday Samant News : उदय सामंतांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्यासाठी ठाकरेंचा 'राईट हँड' कोकणात दाखल; तगडा चेहरा शोधणार?

Uddhav Thackeray Vs Uday Samant : एकीकडे भाजप आमदार आणि नेते नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. आता ठाकरे गटाकडूनही सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा जोरदार चाचपणी सुरू केली आहे.
Uddhav Thackeray, Uday Samant
Uddhav Thackeray, Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Kokan News : शिवसेनेतील उभ्या फुटीला आता दोन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. एकनाथ शिंदेंसोबत अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला मिळालं. लोकसभेला टफफाईट झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात आता विधानसभा निवडणुकीतही कडवी लढत होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत एका एका नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून आता कोकणातील प्रमुख चेहरा आणि शिंदेंचे विश्वासू शिलेदार व मंत्री उदय सामंतांना (Uday Samant) धक्का देण्यासाठी तगडा उमेदवार शोधण्याची मोठी जबाबदारी आपले राईट हँड अर्थातच विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यावर सोपवली आहे.

उद्धव ठाकरेंच्या आजपर्यंतच्या यशस्वी राजकीय खेळ्यांमागे त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांचा मोठा हात आहे.त्याचंच बक्षीस म्हणून त्यांना काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधान परिषदेची आमदारकीही मिळाली.

आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेचा स्ट्राईक रेट कायम ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे.त्यात त्यांच्या निशाण्यावर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असणार आहे.आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नार्वेकर यांच्यात गेमचेंजरची भूमिका निभावण्याची ताकद आहे.

Uddhav Thackeray, Uday Samant
Jayanat Patil News : अशोकराव, जीवनराव, सक्षणा व धैर्यशील यांचे एकमत झाले नाही तर... मीच उभारणार; जयंत पाटलांचा इच्छुकांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांचं रत्नागिरी- सिंधुदुर्गसह कोकणच्या राजकारणात मोठा दबदबा राहिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सामंत यांनी शिवसेनेतील बंडात उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री शिंदेंनीही त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता महायुती सरकारमध्ये सामंत यांच्याकडे उद्योग खातं दिलं.आता याच उदय सामंतांच्या राजकीय साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी मिलिंद नार्वेकर (Milind Narwekar) कोकणातून कोण शिलेदार शोधून काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांचा हा पहिल्यांदाच कोकण दौरा होत आहेत. नार्वेकर यांची पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी(ता.13) रात्री उशिरापर्यंत खलबतं झाली.विधानसभेच्या चाचपणी हाच नार्वेकर यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यामागचा मूळ हेतू असल्याचे जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकीकडे भाजप आमदार आणि नेते नितेश राणे यांनी मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. आता ठाकरे गटाकडूनही सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर यांनी दंड थोपटले असून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारी दिल्यास मी उदय सामंत यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Uddhav Thackeray, Uday Samant
Jayant Patil News : जयंत पाटलांचे सूचक संकेत; 'अशोकभाऊंना तिकीट द्या म्हणणाऱ्यांना बाहेर कशाला काढता, आत बसवा!'

रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा असलेल्या शिंदे गटाच्या उदय सामंत यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गट आत्तापासूनच तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. लोकसभेत नवख्या उमेदवारांनीही दिग्गज नेत्यांना पाणी पाजल्याचे समोर आले होते.आता ठाकरेंनी जबाबदारी दिल्यानंतर नार्वेकरांचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या उदय सामंतांविरोधात कोणाला उमेदवारीसाठी घोषित करतात हे लवकरत स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरी-संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघासाठी सध्या शिवसेना ठाकरे गटात अनेक नावे चर्चेत आहेत.तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत नाराजीची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार राजन साळवी यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असल्याचे सपून राहिलेले नाही.उघड आहे.यातून आमदार नार्वेकर कसा मार्ग काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray, Uday Samant
Balasaheb Thorat : तीन तलवारी एका म्यानात, कशा राहतील? तिसऱ्याची धडपड बघा; थोरातांनी अजितदादांना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com