Uddhav Thackeray News : ठाकरे गटाच्या पठ्ठ्याने थेट मुंबई-गोवा हायवे रोखला, गुन्हा दाखल!

Kokan News : "संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.."
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : गोवा महामार्गाच्या कामाच्या अनेक तक्रारी आहेत. कोकणातील चिपळूणजवळील कोंडमळा या ठिकाणी होत असलेल्या अडचणीबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते उध्दव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह 27 जणावर गुन्हे दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
PM Modi Pune Visit : भष्ट्राचाराचे आरोप केलेल्यांकडून मोदी पुरस्कार स्वीकारणार का ?; ठाकरे गटाचा सवाल

मुंबई- गोवा महामार्गावर कोंडमळा, असूरडे, वहाळफाटा येथील लोकांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर भुयारी मार्ग बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, जनावरे यांना रस्ता ओलांडून ये जा करावी लागत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाने संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती.

Uddhav Thackeray
Supreme Court Result : उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरला 'टर्निंग पॉईंट'; 'ती' भीती अखेर खरी ठरली !

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या आंदोलनकर्त्या 27 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. यामुळे गुन्हा दाखल झाल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत विजय सहदेव शिरसाठ यांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com