

Ulhasnagar Politics News : सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीला मुहूर्त मिळाली असतानाच राजकीय समीकरणांना अचानक 'ब्रेक' लागला आहे. यामुळे इच्छुकांच्या मोर्चेबांधणी देखील खो लागला असून त्यांची गणितं बिघडली आहेत. महापालिकेतील सात नामनिर्देशित सदस्यांसाठी ७ सप्टेंबरची अर्ज प्रक्रिया आणि ११ सप्टेंबरची विशेष महासभा महापौरांच्या निर्देशानुसार अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महापालिकेतील सात स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना सोमवारी (ता. ७) अचानक नाट्यमय वळण मिळाले. सात महिन्यांनंतर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याने भाजप आणि शिवसेनेतील इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या प्रसंगीच महापौरांच्या पत्रानंतर आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता आणि सर्वपक्षीय गटनेत्यांना अधिकृत पत्राद्वारे स्थगितीची माहिती दिली.
महापौरांचे पुढील निर्देश मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया स्थगित राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बदललेल्या संख्याबळामुळे सातपैकी चार स्वीकृत सदस्य भाजपचे, तर तीन शिवसेनेचे होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे दोन्ही पक्षांतील अनेक इच्छुकांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. अशात अर्ज भरण्याच्याच दिवशी प्रक्रिया स्थगित झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले आहे.
सहा उमेदवारांनी अर्ज भरले
महापौरांच्या आदेशानंतर आयुक्तांनी स्वीकृत सदस्यांच्या निवडणूक प्रक्रियेला अनिश्चिचित काळासाठी स्थगिती दिली. असे असतानाही भाजपच्या वतीने सहा उमेदवारांचे अर्ज आयुक्तांच्या कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.