DJ Controversy : 'हिंदू सण साजरा करताना कोणताही आवाज कमी होणार नाही!', शिंदेंच्या मंत्र्याकडून फडणवीसांच्या आवाहनाला छेद

Yogesh Kadam On DJ Controversy : ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून सध्या वाद निर्माण झाला असतानाच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वक्तव्य समोर आले आहे. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
DJ Controversy; Devendra Fadnavis And Eknath Shinde
DJ Controversy; Devendra Fadnavis And Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Vidyanand Bapat DJ Controversy : राज्यात सध्या विद्यानंद बापट यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे ‘डीजे’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांनी डीजेच्या दणदणाटाला तीव्र विरोध करत सणांच्या वेळी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या भूमिकेनंतर आता दोन मतप्रवाह तयार झाले असून, एक डीजेला विरोध करणारे आणि दुसरे त्याबाजूने आहेत. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या भाष्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला छेद देणारे भाष्य केलं आहे.

राज्यात विद्यानंद बापट यांच्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘डीजे’विरोधात मत मांडले आहे. त्यांनी सण आणि उत्सवांमध्ये सुरू झालेल्या ‘डीजे’सारख्या काही चुकीच्या पद्धती एकदम बंद करता येत नाहीत, असे मत मांडताना लोकसहभागातून ‘डीजे’चे स्तोम कमी करावे लागणार आहे. तरच यावर योग्य तोडगा काढला जाईल. तोपर्यंत पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनिप्रदूषण करून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

फडणवीस यांनी सर्व सण पारंपरिक पद्धतीनेच साजरे होतील, यादृष्टीने पावले उचलण्याबाबत आमची दिशा स्पष्ट असल्याचेही सांगितले आहे. तर नागरिकांना साऊंड सिस्टिममधून भूकंप आल्यासारख्या आवाजाचा त्रास होतो. यामुळे पुणेकरांना हा त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाहीही दिली.

DJ Controversy; Devendra Fadnavis And Eknath Shinde
Yogesh Kadam : कोकणात भाजप-शिवसेना वॉर सुरूच, ' ते मंत्री झाले तरीही...', माजी आमदाराचा कदमांवर प्रहार

दरम्यान, नागपुरात देखील भाजपचे माजी आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संदीप जोशी यांनी डीजेविरोधात लोकचळवळ उभारण्याची घोषणा करताच पोलिस आयुक्तांनी शहरात डीजेवर नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्याची घोषणा केली.

एकीकडे अशा पद्धतीने ‘डीजे’विरोधात वारे असतानाच फडणवीस यांच्याच सरकारमधील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर विरोधी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमातील आपल्या भाषणात कदम यांनी हिंदू सण साजरे करताना कोणताही आवाज बंद होणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.

विद्यानंद बापट यांच्या वक्तव्याचा समाचार घेत कदम यांनी हिंदू सण आणि उत्सव हे परंपरेनुसार आणि उत्साहात साजरे होणारच, असं म्हटलं आहे. यामुळे एकीकडे विद्यानंद बापट यांच्या वक्तव्याविरोधात योगेश कदम यांनी थेट आव्हान दिल्याची चर्चा सुरू आहे.

DJ Controversy; Devendra Fadnavis And Eknath Shinde
Yogesh Kadam Tweet: फडणवीसांचा घायवळ प्रकरणावर मोठा खुलासा; योगेश कदमांचं काही वेळातच सूचक ट्विट; म्हणाले,'छोटी मोठी वादळं...'

दुसरीकडे योगेश कदम यांनी विद्यानंद बापट यांना बोलताना थेट मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आवाहनालाच आव्हान दिल्याचीही आता चर्चा रंगली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या विषयाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com