Vijay Wadettiwar Video : रुपाली चाकणकरांना पाठींबा देणाऱ्या काँग्रेस नेत्यावर विजय वडेट्टीवार प्रचंड संतापले, 'वैयक्तिक संबंध..'

Vijay Wadettiwar Rupali Chakankar Arvind Shinde : अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकर यांची पाठराखण केली होती. त्यावरून विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर विरोधी पक्षासोबत सत्ताधारी पक्षातून देखील टीका होत आहे. या पार्श्वभूवीर काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी चाकणकरांची पाठराखण केली होती. ते म्हणाले, 'रुपाली चाकणकर यांची बदनामी करू नका, गरज पडल्यास त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करू.'

अरविंद शिदेंच्या या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार प्रचंड संतापले. ते म्हणाले, 'कोणी समर्थन केलंय तो त्याचा वैयक्तिक विषय असू शकतो. अरविंद शिंदे कोण आहे? कुठला आहे? भरणेंनी समर्थन केलं होतं त्यांना प्रचंज ट्रोल केलं गेलं. मोठे मासे खरातांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे.

'अंधश्रदा ठेऊन ज्या प्रकारे वागले त्यातून महाराष्ट्राच्या सरकारची नाचक्की झाली आहे. हे प्रकरण ज्यानी बाहेर काढले त्याला अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांवर प्रचंड दबाव आहे पण परवा आम्ही विधीमंडळात खरातची वरात काढू.', असे देखील त्यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar
Ashok Kharat Crime: खरात 'कनेक्शन' अंगलट,राजीनाम्यासाठी दबाव; चाकणकरांनी घेतली थेट 'डीजीपी' दातेंची भेट, दिली 'ही' मोठी अपडेट

महायुतीचे किती नेते गुंतले?

मुजोर रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला. पण या प्रकरणात महायुतीचे नेते आणि खरात यांच्यातील संबंध उघडपणे दिसून येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, महाराष्ट्राचा ‘एपस्टीन’ ठरलेला महायुतीचा लाडका भाऊ खरात याने केलेली कृत्यं ही अत्यंत घृणास्पद असून त्याला कोणत्याही परिस्थितीत माफी दिली जाऊ शकत नाही. त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जावी. आणि या प्रकरणात त्याच्यासोबत महायुतीचे किती नेते गुंतले आहेत याचीही माहिती राजकारण मध्ये येऊ न देता बाहेर यायला हवी, असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Vijay Wadettiwar
Rupali Chakankar News: महापालिका निवडणुकीत पराभव ते महिला आयोगाच्या अध्यक्षा; अशी आहे रुपाली चाकणकरांची राजकीय कुंडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com