
Mumbai News : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा सध्या मोठ्या वादात सापडला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंवर केलेल्या एका गाण्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतप्त शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केल्यानंतरही त्याचे महायुती सरकार आणि शिवसेनेला डिवचणारे एकापाठोपाठ एक अशी गाणी सुरुच आहे. त्यामुळे कुणाल कामरा (Kunal Kamra) विरुद्ध शिवसेना हा वाद आता टोकाला पोहोचला आहे. त्यातच मंत्री शंभूराज देसाई यांनी आता शिवसेना स्टाईलनं कामराला धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच राजकीय नेत्यांवर अशाप्रकारची टीका खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. या गाण्यासंबंधी कुणाल कामराला पोलिसांकडूनही चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आले होते. एकीकडे शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तर दुसरीकडे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी कामराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.मंत्री शंभूराज देसाई यांनी कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ, असा इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यामुळे शिवसैनिक इतके दिवस गप्प असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
पण कुणाल कामरा हा आता मर्यादेच्या बाहेर गेला आहे.पाणी डोक्यावरून गेले आहे.आम्ही त्याच्या स्टुडिओत जाऊन त्यांनी एकनाथ शिंदेंविषयी काढलेल्या व्हिडिओचा प्रसाद त्याला दिला. आता तो मुद्दामहून रोज एक नवीन व्हिडिओ रिलीज करत आहे. तो हा प्रकार जाणूनबुजून करत असल्याचा आरोपही शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.
शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई म्हणाले, कुणाल कामराने आधी एकनाथ शिंदेंची बदनामी केली.त्यानंतर त्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही बदनामी केली.तसेच पंतप्रधान मोदी आणि सुप्रीम कोर्टाबाबतही चुकीचे विधान केले.आम्ही शिवसैनिकांनी त्याला शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्यायची आता वेळ आली आहे, असल्याचा इशाराही दिला आहे.
आमची सहनशीलता आता संपली असून आता आम्ही त्यांना आमच्याच भाषेत उत्तर देऊ. आम्ही मंत्री आहोत पण शिवसैनिक आधी येतात. तो कुठेही असला, कोणत्याही बिळात लपू दे, त्याला पकडून परत आणून प्रसाद दिला जाईल. कामराला त्याच्या बिळातून बाहेर काडून प्रसाद दिला जाणार असल्याचंही देसाई यांनी यावेळी म्हटलं.
आम्हाला नुकतेच थांबवले आहे, पण कामराने कुठे भेटायचे ते सांगावे. आम्ही शिवसैनिक भेटून प्रसाद देणार असल्याचं विधान मंत्री आणि नेते शंभूराज देसाई यांनी केल्यामुळे कामरा विरुद्ध शिवसेना हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.