

राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक चर्चा सुरू आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरीही रक्कम जमा न झाल्याने “योजना बंद झाली का?”, “कागदपत्रांमध्ये काही अडचण आहे का?” असे प्रश्न विचारले जात आहेत.
प्रत्यक्षात मात्र ही परिस्थिती तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यावेळी निधी उपलब्ध होण्यास उशीर झाल्यामुळेच जानेवारीचा हप्ता वेळेत वितरित होऊ शकला नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपासूनही हप्ते उशिरा मिळत असल्याने महिलांच्या मनात शंका निर्माण झाल्या होत्या. विशेषतः आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी ही 1500 रुपयांची मदत महत्त्वाची ठरते. घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधे किंवा इतर गरजांसाठी या पैशांवर अनेक महिला अवलंबून आहेत. त्यामुळे हप्ता लांबणीवर गेल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होतो.
दरम्यान, सरकारकडून याबाबत महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 98.45 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील निर्णय जारी करण्यात आला असून निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे संकेत मिळत आहेत.
तसेच, काही ठिकाणी तांत्रिक पडताळणी, बँक खात्यांची तपासणी आणि आधार लिंकिंगसारख्या प्रक्रियांमुळेही थोडा विलंब झाल्याची चर्चा आहे. खात्याची माहिती अचूक नसल्यास किंवा बँक तपशीलात त्रुटी असल्यास पैसे जमा होण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे लाभार्थींनी आपली कागदपत्रे आणि बँक माहिती अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.
आता सर्वांचे लक्ष फेब्रुवारीपूर्वी पैसे जमा होतात का याकडे लागले आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते एकत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शासनाकडून स्पष्ट तारखेची माहिती येणे बाकी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.