Congress News : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर तीन वर्षांनी नांदेडमध्ये पक्ष भाकरी फिरवणार!

Congress comeback plan in Nanded : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर 3 वर्षांनी नांदेडमध्ये पक्ष पुन्हा बळकट करण्याच्या हालचाली सुरू. राजकीय घडामोडींचा आढावा.
Congress News : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर तीन वर्षांनी नांदेडमध्ये पक्ष भाकरी फिरवणार!
Published on
Updated on

Nanded Politics News : 2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने जागा राखत आपली ताकद दाखवून दिली. परंतु हे यश विधानसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला टिकवता आले नाही. या सर्वांचा परिणाम आता काँग्रेस जिल्ह्यातील संघटनात्मक मोठ्या फेरबदलामध्ये होणार आहे. जिल्हाध्यक्षांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या व तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यासंदर्भात मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

'संघटन सृजन मोहिम' अंतर्गत हे फेरबदल केले जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील तिन्ही जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी करून नवे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि कार्यकारिणीची घोषणा लवकरच केली जाणार आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेश कार्यालयात मंगळवारी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह तिन्ही जिल्हाध्यक्ष यांना बोलावण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस कडून राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.

Congress News : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर तीन वर्षांनी नांदेडमध्ये पक्ष भाकरी फिरवणार!
IAS Transfer News : प्रशासनात फेरबदलाचे वारे! 24 दिग्गज अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश; वीर विक्रम यादव यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी!

नांदेड साठी तेलंगणातील हरकला वेणू गोपालराव यांना निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची नांदेडसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यावर लातूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. पक्षासाठी हा मोठा धक्का होता.

यातून सावरत नांदेडमधील निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर काँग्रेसने लोकसभेची जागा राखली. परंतु काही महिन्यातच खासदार वसंतराव चव्हाण यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर पक्षाने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने ही जागा राखत सत्ताधारी महायुतीला दणका दिला होता. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.

Congress News : अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर तीन वर्षांनी नांदेडमध्ये पक्ष भाकरी फिरवणार!
Government Decisions : सरकारचा निर्णयांचा धडाका! फक्त 4 दिवसांत घेतले तब्बल 1700 निर्णय!

नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका निवडणुकीतही पाहायला मिळाली. 2029 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत काँग्रेसने नांदेड जिल्ह्यात नव्याने संघटनात्मक बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तिन्ही जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बदलण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. लवकरच काँग्रेस पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक व समन्वयक नांदेडचा दौरा करणारा असून पक्षाच्या सूचनेनुसार संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com