

Mumbai News: महायुती सरकारने सुरू केलेली आणि विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीनं आगामी काळात लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील लाखो महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली होती.
विधानसभा निवडणुकीवेळी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांना 1500 च्या ऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याचा शब्द कधी पूर्ण करणार याविषयीची विचारणा सातत्यानं केली जात होती. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार दावे-प्रतिदावे यांचे घमासानही सुरू होते.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्यासंदर्भात राज्य नव्हे,तर केंद्रीय स्तरावरुन एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून सादर केलेल्या (EAC PM) एका शोधनिबंधात सरकारकडे मोठी शिफारस करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून महिलांविषयीच्या दोन वेगवेगळ्या राज्यांतील योजनांविषयी महत्त्वपूर्ण अभ्यास करत अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात महाराष्ट्रातील 'माझी लाडकी बहीण योजना' आणि ओडिशातील 'सुभद्रा योजनांमुळे महिलांचा मोठा आर्थिक लाभ झाल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
'ईएसीपीएम'च्या एका शोधनिबंधात महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढवण्यात यावी असं महत्त्वपूर्ण विधान करण्यात आलं आहे.
तसेच महाराष्ट्रातील लाडकी बहीण आणि ओडिशातील सुभद्रा योजना या दोन योजनांमुळे महिलांना मोठा आर्थिकआधार मिळाल्याचं महिलांची बचत वाढली, घरगुती खर्चात मदत झाली आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली' असे या अहवालात म्हटले आहे.या योजनांमुळे महिलांच्या बचतीत बचत वाढ, घरगुती खर्चास हातभार आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात सुमारे शिल्लक 84 टक्क्यांनी वाढ झाल्याची अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे. तसेच दुसरीकडे महिलांच्या महिन्याच्या खर्चात वाढ झाली असून महाराष्ट्रात त्यात 46 टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.
या खर्चात आरोग्य, शिक्षण आणि रोजच्या गरजांच्या अनुषंगाने खर्च होत असल्याच अहवालात नमूद केलं आहे.लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा महिलांसह त्यांच्या कुटुंबियांनाही झाला असून कुटुंबातील इतर सदस्यांची बचत वाढली असून खर्च कमी झाल्याचा दावाही अहवालात म्हटले आहे
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करण्याचे आवाहन केले होते. वारंवार यासाठी मुदतवाढ दिली होती. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, केवासी भरताना चुकीचा पर्याय निवडल्याने देखील काही महिला अपात्र ठरल्याची माहिती आहे. या योजनेत एकूण 80 लाख महिला अपात्र ठरल्याचं वृत्त समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.