NCP with NDA: शरद पवारांचा पक्षही भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा! अधिवेशन सुरु असतानाच मुख्यमंत्री अचानक दिल्लीला होणार रवाना; नेमकं काय सुरुए?

NCP with NDA: राज्यभरात धुंवाधार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, यापार्श्वभूमीवर फडणवीस दिल्लीला जाऊन काही पॅकेज घेऊन येतात का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP with NDA: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत संध्याकाळी नर्मदा प्रकल्पातील अडचणींबाबत एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून त्या बैठकीसाठी ते जाणार आहेत. राज्यात पूरस्थिती असताना आणि अधिवेशनही सुरु असतानाच मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून मदत मिळू शकेल का? याबाबत हा दौरा असू शकतो. तसंच जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्या भेटीच्या यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

Sharad Pawar
Devendra Fadnavis: फडणवीसांचा मोठा निर्णय! 'त्या' पोलीस अधिकाऱ्याचं कृत्य लाजीरवाणं; बडतर्फीचा दिला इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष देखील एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीला गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे हायकमांड अमित शहा यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करतात का? हे बघणं महत्वाचं असणार आहे. शरद पवारांच्या पक्षात दोन विचाप्रवाह दिसून येत आहेत. यातील एक मोठा गट पक्षानं एनडीएसोबत जावं अशी भूमिका घेताना दिसतो आहे. तर दुसरा गट हा एनडीएसोबत न जाण्यावर ठाम आहे. त्यामुळं याबाबत दिल्ली दरबारी नेमकी काय चर्चा होतेय? हे महत्वाच असणार आहे.

Sharad Pawar
Nashik Crime : चहाच्या व्यवसायात बरकत यावी म्हणून महिला भोंदूकडे गेली अन् फसली, नाशिकमध्ये अशोक खरातसारखेच आणखी एक प्रकरण

राष्ट्रवादीचं विलिनीकरण

दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरण होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. यावरुनच जर हे प्रत्यक्षात आलं तर शरद पवारांचा पक्ष देखील एनडीएमध्ये सहभागी झाल्यासारखा होईल. पण त्यांना सोबत घेण्याबाबत नेमकं काय करता येऊ शकेल? याचीच चाचपणी देखील मुख्यमंत्री दिल्ली दरबारी जाऊन करतील अशी शक्यता आहे.

Sharad Pawar
WhatsApp ban : खासदाराकडून दररोज सकाळी तब्बल 5 हजार लोकांना मेसेज; मजकूर काय? WhatsApp ने उचललं मोठं पाऊल

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या चर्चा सुरु होत्या. पण याबाबत दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी याबाबत ठोस भूमिका मांडली नव्हती. तसंच अशा प्रकारची कुठलीही तत्सम हालचालही होताना दिसत नाही. त्यामुळं हा विषयही बारगळला असल्याचं आता दिसून येत आहे. पण त्यानंत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा मात्र रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com