Laxman Hake Video : मनोज जरांगे पाटलांना लक्ष्मण हाकेंचे ओपन चॅलेंज, 'तुम्ही 25 आमदार पाडाल तर आम्ही 100...'

Laxman Hake open challenge to Manoj Jarange : 25 आमदार पाडण्याचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर लक्ष्मण हाकेंनी पलटवार करत खुले चॅलेंज देत आम्ही तुमचे 100 आमदार पाडू, असे म्हटले आहे.
Laxman Hake challenges Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Laxman Hake controversySarkarnama
Published on
Updated on

Laxman Hake video Maharashtra politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.काही मराठा-कुणबी, कुणबी-मराठा प्रमाणपत्र रद्द झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत 25 ते 30 आमदार पाडण्याचा इशारा दिला होता.

मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांना जाहीर आव्हान दिले. ते म्हणाले, 'हे म्हणत आहेत की, तुमचे 25 आमदार पाडू, अरे मी जाहीर आव्हान स्वीकारतो.

तु आमचे 25 आमदार पाडून दाखव आम्ही तुमचे 100 आमदार नाही घरी बसवले तर नाव लावणार नाही.'जरांगे पाटलांना डिवचत हाके म्हणाले, 'कोण आहे तू, २५ आमदार पाडतोस तू? पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेला होतास ना तेथे ओबीसी किती आहेत तुला माहिती नाही.'

ओबीसींचा लाँग मार्च

ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाची घोसखोरी होत आहे. ओबीसींचे आरक्षण संपवले जात आहे, असा आरोप करत १ सप्टेंबरला निघणाऱ्या ओबीसी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन लक्ष्मण हाके यांनी केले. लाँग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी इंदापूरमध्ये बैठक देखील घेतली.

Laxman Hake challenges Manoj Jarange Patil
Laxman Hake On Jarange : आम्ही बाळासाहेब भवनात गेलो म्हणून जरांगेंच्या पोटात का दुखतं? : लक्ष्मण हाकेंचा सवाल

जरांगे नेमके काय म्हणाले?

'फडणवीस बावनकुळेंच्या हातून मराठ्यांचे वाटोळ करत असाल तर तुमचे 15-20 आमदार पाडत असतो. बावनकुळेला मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याची एवढी पाॅवर दिली ना तर 25 ती 30 सहज पाडील मी. बावकुळे पाहिजे की मराठे पाहिजेत हे ठरावा तुम्ही.'

Laxman Hake challenges Manoj Jarange Patil
Manoj Jarange patil : मराठा-कुणबी दाखल्यांच्या व्हॅलिडिटीवरून मनोज जरांगेंचा एल्गार; ' कॅमेऱ्यासमोर दाखवले पुरावे, फडणवीस-शिंदेंना थेट सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com