Laxman Hake On Jarange : आम्ही बाळासाहेब भवनात गेलो म्हणून जरांगेंच्या पोटात का दुखतं? : लक्ष्मण हाकेंचा सवाल

Manoj Jarange Patil Statement : कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. लक्ष्मण हाके यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune, 06 August : मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्यावरून पुन्हा एकदा सरकारला विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केले आहे. या दोन नेत्यांवर टीका करतानाच जरांगे पाटील यांनी प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तुमच्या बाळासाहेब भवनात ओबीसीचे नेते कसे येतात, असा सवाल केला आहे. त्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जोरदार उत्तर दिले आहे.

प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या हातचे बाहुले बनले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच भडकले आहेत. ‘आम्ही खासदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट यांना निवडून आणलं’ असं म्हणणं म्हणजे आरक्षणासाठी नव्हे, पक्षासाठी काम केल्याची कबुली आहे.

ज्यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाले आहे, त्यांच्यावर न बोलता नेत्यांची बाजू घेतली जात आहे. मनोज जरांगे यांनी कास्ट व्हेरिफिकेशन समितीवर टीका करणे अयोग्य आहे. आम्ही बाळासाहेब भवनात गेलो; म्हणून मनोज जरांगेंच्या पोटात का दुखतं? ते त्यांच्या वडिलांचं कार्यालय आहे का? असा सवाल ओबीसी नेते ॲड लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil
Satara Dcc Bank Election : सातारा जिल्हा बॅंकेसाठी 2011 ठराव : भाजपचे वर्चस्व; फलटण-पाटण वगळता राष्ट्रवादी-भाजप लढत होणार

ज्या एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक केले. जे शिंदे मराठ्यांचं राजकारण करतात, त्यांच्याकडे तुम्ही कशाला जाता, असा सवाल करताच उद्यापासून जाणार नाही. लक्ष्मण हाके हा ओबीसीचा प्रवक्ता आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही हे बेकायदा आहोत, असे सांगत आहोत. आम्ही कोणाला भेटावं, बोलावं, याबाबत अजून तरी आमच्यावर कोणी मर्यादा घातलेली नाही. आम्ही लोकशाही राज्यात राहणारी माणसं आहोत, असे हाके यांनी स्पष्ट केले.

Manoj Jarange Patil
Maharashtra Politics : मोठी बातमी! प्रशांत किशोरांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट; निवडणुकीची रणनीती ठरणार?

आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांभाळून घेतलं, पण आजची त्यांची भूमिका चुकीची वाटली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी. आम्हाला कोणी मोजलं नाही; म्हणून आमचं आंदोलन थांबणार नाही. आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे, असा दावा ॲड लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com